Homeक्राईमइंदिरानगरमध्ये चेन स्नॅचरची हॕटट्रीक; एक लाख ८० हजारांचा ऐवज खेचला

इंदिरानगरमध्ये चेन स्नॅचरची हॕटट्रीक; एक लाख ८० हजारांचा ऐवज खेचला

नाशिक – विशेष प्रतिनिधी
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील सौभाग्य लेणं खेचून पळवण्यात आले. या घटनांमध्ये एक लाख ८० हजारांचा ऐवज पळवण्यात आला असून इंदिरानगरमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना पुन्हा घडू लागल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता सुनिल शिंदे (वय ५४, रा. सुकल्प बंगला प्लॉट न २३ बी, जायभावे नगर, पाथर्डी फाटा, जगन्नाथ मंदिर जवळ इंदिरानगर) या पतीसह घरी आव्हाड पेट्रोल पंपाजवळून घरी परतत असतांना क्रिकेट टर्फजवळ पाठीमागून येणाऱ्या मोटार सायकलवरून दोघेजण आले. त्यापैकी पाठीमागे बसलेल्या युवकाने श्रीमती शिंदे यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीची व २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचली. त्यानंतर दोघांनी पळ काढला. हवालदार झिरवळ तपास करत आहेत.

श्रीमती रिया रामनाथ मांजरेकर (वय ६०, रा. फ्लॅट नं ५, वरदविनायक अपार्टमेंट, जायभावे नगर, सम्राट सिंफोनीच्या बाजुला, पाथर्डी फाटा) या गामणे ग्राऊंड, जायभावे नगर येथून भाजी घेवून परत जात असताना मागुन येणाऱ्या काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून दोघेजण आले. त्यापैकी मागे बसलेल्याने श्रीमती मांजरेकर यांच्या गळयातील ८ ग्रॅम वजनाची व ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत खेचून म्हाडा बिल्डींग कर्मा हाईट्च्या दिशेने पळून गेले. तर श्रीमती दुर्गा वसंत धोंडगे (रा. गोमती अपार्टमेंट, फ्लॅट नं. २, अलकापुरी सोसायटी, प्रशांत नगर पाथर्डी फाटा) या प्रशांत नगर, पाथर्डी फाटा येथील सावली मेडीकल समोरून जात असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून दोघेजण आले. त्यापैकी मागे बसलेल्याने श्रीमती धोंडगे यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची) व ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची खेचून पळवली. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवार तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!