Homeशहर व जिल्हाप्रभाग एकमधील म्हसरूळ परिसरात शिवसेना उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत

प्रभाग एकमधील म्हसरूळ परिसरात शिवसेना उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत

– मतदारांनीच व्यक्त केला विजयाचा ठाम विश्वास

पंचवटी – प्रतिनिधी
महापालिकेच्या प्रभाग एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) यांच्या प्रचारार्थ शनिवारी निघालेल्या प्रचार फेरीचे नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, ठिकठिकाणी महिलांनी केलेले औक्षण तसेच स्वयंस्फुर्तीने सादर झालेले आदिवासी नृत्य अशा उत्सवी वातावरणामुळे शिवसेना उमेदवारांचा विजय हा निश्चित असल्याची प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली.

शिवसेना उमेदवारांनी शनिवारी म्हसरूळ येथील आंबेडकर नगर, पवार वाडी, दत्त मंदिर, वाढणे कॉलनी, मोराडे वस्ती, जाधव वस्ती, गजपंथ नगर
आदी भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. कोणतीही सत्ता अथवा पद नसताना प्रविण जाधव व सहकाऱ्यांनी कोविड काळात तसेच त्यानंतर केलेल्या लोकोपयोगी कामांना मतदारांनी उजाळा दिला. गेली २५ वर्ष फक्त सत्ता उपभोगणाऱ्या नगरसेवकांनी प्रभागाकडे मात्र दुर्लक्ष केल्याची टीका मतदारांनी केली. यावेळी विविध परिसरातील नागरिकांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य यासह विविध समस्यांचा पाढा वाचून दाखवला. प्रचार फेरीत सचिन साळुंखे, सागर नवले, अविनाश लोखंडे, शिवाजी शिंदे, राहुल जाधव, प्रवीण शिंदे, राजू खांदवे, राहुल सानप, अमृता अहिरे, रमेश सोनवणे, संदीप गांगोडे, प्रणव बाविस्कर, अनिकेत खेमणार, अमोल पाटील, सुशांत साळवे यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांचीही संख्या लक्षणीय होती.

आदिवासी नृत्यामुळे आले…..

विजयी मिरवणुकीचे स्वरूप !

शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांनी म्हसरूळ व परिसरात काढलेल्या प्रचार फेरीचे मतदारांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. आपल्या समस्या मांडताना त्या गेल्या २५ वर्षात सोडविल्या गेल्या नाही, याची खंत व्यक्त केली. नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने फटाक्यांची आतषबाजी करत शिवसेना उमेदवारांचे स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून विजयी भवः असे सुयश चिंतले. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य सादर केल्याने ही प्रचार फेरी म्हणजे विजयाची मिरवणूक असल्याची भावना मतदारांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!