Homeक्राईमफुलेनगर गोळीबार; माजी नगरसेवक जगदीश पाटीलला पाच दिवस पोलीस कोठडी

फुलेनगर गोळीबार; माजी नगरसेवक जगदीश पाटीलला पाच दिवस पोलीस कोठडी

– भक्कम तांत्रिक पुराव्यामुळे अडचणी वाढल्या…

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
फुलेनगरमधील राहुल वाडी येथे सागर विठ्ठल जाधव याच्यावर गोळीबार करणाऱ्या प्रतिस्पर्धी टोळीसोबत कटात सहभागी असल्याच्या गंभीर आरोपावरून पंचवटी पोलिसांनी अटक केलेले भाजपाचे माजी नगरसेवक इंजिनिअर जगदीश पाटील याला २६ सप्टेंबरपर्यंत अर्थात पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांच्या हाती भक्कम तांत्रिक पुरावे असल्यामुळे पाटील याच्या अडचणी वाढल्या आहेत.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, फुलेनगर मधील राहुलवाडी येथे १७ सप्टेंबरला रात्री उशिरा अंत्यसंस्कार आटोपून ओट्यावर बसलेला सागर विठ्ठल जाधव (वय ३५) यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने विकी उत्तम वाघ व विकास उर्फ विकी विनोद वाघ व इतर साथीदार यांनी पूर्व वैमनस्य व वर्चस्ववादातून पिस्तुलातून गोळी झाडली होती. ही गोळी त्याच्या डाव्या डोळयाच्या खाली लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पंचवटी व भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक तसेच गुंडा विरोधी पथकाने संयुक्त कामगिरी करत ११ जणांना अटक केली होती. तर उर्वरीत पाचवा जणांचा अद्याप शोध सुरू आहे.

तपासादरम्यान पोलिसांना अमरावती कारागृहात शिक्षा बंदी असणारा शेखर निकम याच्यासोबत हल्ल्यापूर्वी जगदीश पाटील व हल्लेखोर यांची बैठक झाल्याचे तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पंचवटी पोलिसांनी रविवारी जगदीश पाटील यास अटक केल्याने राजकीय वर्तृळात खळबळ उडाली होती. तर माजी नगरसेवक उद्धव निमसे याला खून प्रकरणात अटक झाल्यानंतर माजी नगरसेवक खुनाच्या प्रयत्नात अटक झाल्याने भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!