Homeशहर व जिल्हाप्रभाग एकमधील मतदार यंदा भाकरी बदलणारच ! शिवसेना उमेदवारांना एकमुखी पाठिंबा !!

प्रभाग एकमधील मतदार यंदा भाकरी बदलणारच ! शिवसेना उमेदवारांना एकमुखी पाठिंबा !!

– सर्वथरातील मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

पंचवटी । प्रतिनिधी
मागील २० ते २५ वर्षात महापालिकेत महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते आदी पदे भूषवणाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे प्रभाग क्र. १ मध्ये विकासाची कोणतीही कामे झाली नाही. इतकेच नव्हे तर मुलभूत सुविधांसाठी आजही नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे भाकरी बदलण्याची वेळ मतदानाच्या रुपाने आली असून
शिवसेना (शिंदे) पक्षाच्या सुशिक्षित व नव्या दमाच्या चेहऱ्यांना सभागृहात पाठवण्याचा निर्धार प्रभाग एकमधील मतदारांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग एकमधील शिवसेना उमेदवार शिवसेना उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पोकार कॉलनी, विजय नगर, शिवगणगेश्वर नगर, रामेश्वर नगर, मोराडे वस्ती, जगन्नाथ लॉन्स प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रभाग एकमध्ये या अगोदर लोकप्रतिनिधींनी केवळ मानाची व सत्तेची पदे भूषवली. मात्र प्रभागाची परिस्थिती बदलली नाही. खड्डयांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून वाहतुकीचा बट्टयाबोळ झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून रात्री बेरात्री पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. घंडागाड्यांची अनियमितता, स्वच्छतेचा अभाव यामुळे आरोग्याच्या समस्या सतत भेडसावतात, अशा अनेक तक्रारी मतदारांनी प्रचार फेरीदरम्यान व्यक्त केल्या. 

शिवसेना उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) यांना मिळणाऱ्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून शिवसेना नेते, पदाधिकारी यांनी या प्रभागाकडे लक्ष केंद्रित केल्याने शिवसेना उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!