Homeमहाराष्ट्र'सीसीटीएनएस' कार्यप्रणाली; नाशिक ग्रामीण पोलीस दल राज्यात व्दितीय; सलग दुसऱ्यांदा ठरले मानकरी

‘सीसीटीएनएस’ कार्यप्रणाली; नाशिक ग्रामीण पोलीस दल राज्यात व्दितीय; सलग दुसऱ्यांदा ठरले मानकरी

– पोलीस महासंचालकांचे हस्ते गौरव…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
माहे नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत राज्यात ‘सीसीटीएनएस’ प्रणालीमध्ये नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन २०२५ या वर्षाचे व्दितीय क्रमांक विजेता पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्यात सीसीटीएनएस कार्यप्रणाली अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये प्रथम विजेता सांगली, व्दितीय विजेता नाशिक ग्रामीण, तर तृतीय क्रमांक मुंबई पूर्व यांची निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील राखीव पोलीस बल गट क. २, रामटेकडी येथे २० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा समारोप सभारंभ १९ सप्टेंबर रोजी
संपन्न झाला. या सोहळ्यात राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तव्य मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलीस घटकांना बक्षिस वितरण करण्यात आले. पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला यांच्या हस्ते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व सीसीटीएनएस कार्यप्रणालीचे महिला पोलीस अंमलदार सीमा उगलमुगले, ज्योती आहिरे, निकिता खुळगे यांना व्दितीय क्रमांक विजेता सन्मानचिन्ह व बक्षीसपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील व घटकांची वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. नाशिक ग्रामीण पोलीस दलाने गतवर्षी देखील व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून यश संपादित केले होते, तसेच यावर्षी पुन्हा एकदा आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटविला आहे. 

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये जिल्हयातील पोलीस ठाणे निहाय अटक होणा-या आरोपीतांची कुंडली जुळवून गुन्हे प्रकटीकरण व गुन्हे प्रतिबंध करण्यास प्रभावी कार्यवाही केली आहे. सन २०१७ पासून महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत सीसीटीएनएस (CCTNS) कार्यप्रणाली मध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलीस घटकांना बक्षीस प्रदान करण्यात येते. सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा जास्तीत जास्त वापर गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी करण्यात यावा याकरीता CES Ranking च्या आधारे घटकांकडून मासिक कामगिरीचा आढावा घेण्यात येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!