Homeशहर व जिल्हाअब मोरे नैया पार करो . . . ; उस्ताद अरमान खान...

अब मोरे नैया पार करो . . . ; उस्ताद अरमान खान यांच्या सुरावटीने नाशिककर मंत्रमुग्ध

नाशिक – विशेष प्रतिनिधी
दिव्यांच्या तेजाने लखलखलेल्या दाही दिशा, धुक्याने लपटलेली सृष्टी, पाखरांचा मधुर किलबिलाट, मनाला सुखावणारा हवेतील गारवा, अत्तर अन् उदबत्तीचा मंद सुवास आणि सप्तसुरांनी मोहून गेलेला आसमंत अशा मंतरलेल्या वातावरणात उस्ताद अरमान खान यांच्या अद्वितीय सुरुवटीने नासिककरांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते संस्कृती नाशिक यांच्या तर्फे आयोजित दिवाळी पहाट पाडवा या संगीत मैफलीचे.

बुधवार (दि 22) शहरातील ऐतिहासिक परंपरा असलेल्या नेहरू चौक येथील पिंपळपारावर रामपूर सहस्वान घराण्याची परंपरा असलेले प्रख्यात गायक उस्ताद अरमान खान यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुरावटीने नाशिककर संगीतप्रेमींची मने जिंकली. या संगीत मैफिलीची सुरुवात ‘अब मोरी नैय्या पार करो तुम’ या बंदिशीने झाली. यानंतर देशकार रागातील ‘ ऊ तो तेरे चरण जागे’ हे गीत सादर करण्यात आले, हे गीत सादर होत असताना गीत आणि वाद्यांच्या अनोख्या मिलाफाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे चारुकेशी रागातील ‘ हे सुरानों चंद्र व्हा ‘ हे नाट्यगीत गातांना अरमान खान यांच्या सुरात सुर मिसळवत नाशिककर रसिकांनी कुसुमाग्रज यांना अभिवादन केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीत’आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा’ या संत नामदेव यांची रचना असलेल्या अभंगाने ही अवीट गोडीची मैफिल विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली. या मैफिलीत अरमान खान यांना उन्मेष बॅनर्जी (तबला), सुभाष दसककर (संवादिनी), रिक मुखर्जी (बासरी), दिंगबर सोनवणे (पखवाज) आणि आदित्य जाधव (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन केतकी कुलकर्णी यांनी, सन्मानपत्राचे वाचन ज्येष्ठ कवी मिलिंद गांधी यांनी केले तर ध्वनी व्यवस्था राम नवले यांची होती. दरम्यान शहरातील ज्येष्ठ वेदमूर्तींनी शांती सूक्त पठाण केले आणि नामांकित व्यक्तींकडून दीपप्रज्वलन करून या मैफिलीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. नासिककर कानसेनांनी उत्स्फूर्त दाद दिलेल्या या मैफलीची सांगता भैरवी रागातील राम भजनाने झाली. या कार्यक्रमास संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांच्यासह आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, खासदार पराग (राजाभाऊ) वाजे, धुळ्याच्या खासदार डॉ शोभा बच्छाव, माजी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, लक्ष्मण सावजी, माजी महापौर अशोक मुर्तडक, यतीन वाघ, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, एनडीसीएचे अध्यक्ष विनोद शहा, डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, मविप्र सरसिटणीस ॲड नितीन ठाकरे, डॉ नारायण विंचूरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

माणिक कानडे यांना संस्कृती गौरव प्रदान

यावेळी सामाजिक व नाट्य क्षेत्रात वेशभूषा आणि रंगभूषेच्या माध्यमातून पडद्यामागील कार्याला कलात्मकतेची नवी जोड देणाऱ्या ज्येष्ठ रंगभूषाकार माणिक कानडे यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल मानाच्या “संस्कृती गौरव” या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!