Homeशहर व जिल्हाराजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले 'बाजीगर' !

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

– पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते…

पंचवटी । विशेष प्रतिनिधी
पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरूनही ‘बाजीगर’ ठरले आहेत. प्रभागात नव्हे तर पंचवटी विभागात सर्वाधिक मते मिळवत त्यांनी दणदणीत विजय संपादन केला. गोवर्धने यांनी १६,७२९ मते तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार व भुजबळ परिवाराच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या अंबादास खैरे यांचा ९,०१८ मतांनी मोठ्या फरकाने दारुण पराभव केला.
अंबादास खैरे हे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समता परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप खैरे यांचे बंधू असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. माजी खासदार समीर भुजबळ व शेफाली भुजबळ यांनी या प्रभागात तळ ठोकून केंद्रित केले होते. त्याचबरोबर समता परिषदेचे पदाधिकारी व भुजबळ समर्थक तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रभागात मोठ्या संख्येने प्रचार करत होते. मात्र, मतदारांनी भाजपाच्या तरुण नेतृत्वाला स्पष्ट कौल दिला.
गोवर्धने यांचा जनसंपर्क आणि मित्रत्वाचे संबंध याच्या बळावर त्यांनी विजयाचा मार्ग लीलया गाठला. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गौरव गोवर्धने यांनी प्रभागात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. रस्त्यावर उतरून काम करण्याची शैली आणि नागरिकांशी सतत संवाद हेच त्यांच्या यशाचे प्रमुख कारण ठरले. मतदारांनीही मतपेटीतून गोवर्धने यांना भरभरून प्रतिसाद दिला. या निवडणुकीत विजयी उमेदवार अ गटातून प्रियंका माने (१४२१४), ब गटातून जुई शिदे (१४२०५), क गटातून मच्छिंद्र सानप (११७२१), ड गटातून गौरव गोवर्धने (१६७२९) यांनी सर्वाधिक मते मिळवत विजय मिळविला. अॅड. गौरव गोवर्धने यांच्या प्रवेशामुळे या प्रभागात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गौरव गोवर्धने यांनी प्रभागात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. रस्त्यावर उतरून काम करण्याची शैली आणि नागरिकांशी सतत संवाद हेच त्यांच्या यशाचे प्रमुख कारण ठरले.

भाजपाच्या चारही उमेदवारांना निवडून आणण्यास भाजपाचे आमदार राहुल ढिकले व माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे मार्गदर्शन व मोलाची साथ लाभली. आगामी काळात होणारा कुंभमेळा साधुग्राम व तपोवन याच प्रभागात आहे. तसेच प्रशासनासदेखील जनसंपर्क असलेले नगरसेवक गोवर्धने यांची मोठी मदत होईल. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींकडून व या दोघांचे विश्वासू सहकारी असलेले, सुशिक्षित व अभ्यासू, कायद्याचे ज्ञान असलेले नगरसेवक अॅड. गौरव गोवर्धने यांच्यावर महापालिकेत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, असा विश्वास प्रभागातील पदाधिकारी, नागरिक व समर्थक व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

गावठाणाचे घडवू या भविष्य…निवडून आणा धनुष्य ! प्रभाग १३ मध्ये शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच...

0
नाशिक । प्रतिनिधी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्य्यात आलेली असताना शनिवारी अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या उपमुख्यमंत्री व ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड जाहीर सभेने शहरातील...

error: Content is protected !!