Homeक्राईमफुलेनगर गोळीबार प्रकरणी प्रतिस्पर्धी टोळीतील ११ जण जेरबंद; मुख्य संशयितांचा शोध सुरूच

फुलेनगर गोळीबार प्रकरणी प्रतिस्पर्धी टोळीतील ११ जण जेरबंद; मुख्य संशयितांचा शोध सुरूच

– पंचवटी, भद्रकाली पोलीस व गुंडा विरोधी पथकाची संयुक्त कामगिरी

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
फुलेनगरमधील राहुल वाडी येथे सागर विठ्ठल जाधव याच्यावर गोळीबार करणाऱ्या प्रतिस्पर्धी टोळीतील ११ जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पंचवटी पोलीस, भद्रकाली ठाण्यातील गुन्हे शोध पथक व गुंडा विरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली असून प्रत्यक्ष गोळीबार करणारे विकी उत्तम वाघ व विकास उर्फ विकी विनोद वाघ, अमोल पारे उर्फ बबल्या तसेच साथीदारांचा माग काढला जात आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, १७ सप्टेंबरला रात्री उशिरा फुलेनगर मधील राहुलवाडी येथे ओट्यावर बसलेला सागर विठ्ठल जाधव (वय ३५) यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने विकी उत्तम वाघ व विकास उर्फ विकी विनोद वाघ व इतर साथीदार यांनी पूर्व वैमनस्य व वर्चस्ववादातून पिस्तुलातून गोळी झाडली होती. ही गोळी त्याच्या डाव्या डोळयाच्या खाली लागून तो गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासास प्रारंभ केला. हा गुन्हा संवेदनशील असल्याने तसेच टोळी युद्धाच्या अनुषंगाने पोलीस संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, किशोर काळे, सहायक आयुक्त श्रीमती संगिता निकम यांनी संशयित आरोपींचा शोध घेवून तात्काळ अटक करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक, भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक व गुंडा विरोधी पथक यांची वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली होती. या पथकांनी मानविकौशल्य व तांत्रिक विश्लेषणाव्दारे सदर गुन्हयातील संशयित आरोपी हे वैशालीनगर, नवनाथनगर, वज्रेश्वरी व फुलेनगर परिसरात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे सापळा लावुन एकूण ११ संशयित आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांची नावे निलेश बाळ पवार (वय २७, रा. राजेय अर्पा. विंग नं-४, फ्लॅट नं-१३, मेहेर धाम, म्हसरूळ), आकाश राहुल निकम (वय २४, रा. राजेय अर्पा. विंग नं-४, फ्लॅट नं-९, मेहेर धाम, म्हसरूळ), रोशन राजेंद्र आहिरे (वय-३०, रा. प्लॉट नं-०७, कर्णनगर, पेठरोड), सचिन मोतीराम गांगुर्डे (वय २१, रा. गजानन चौक, फुलेनगर), इरफान सागिर खाटिक (वय-४४, रा. जयवंत सोसायटी, सावरकर गार्डन जवळ, आकाश पेट्रोल पंपाजवळ, म्हसरूळ), आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे (वय ३०, रा. पालिका बाजार समोर, बुध्द विहार शेजारी शनि मंदिर जवळ, पेठरोड), आदित्य दिनेश आहिरे (वय २२, रा. गोविंदा बी फ्लॅट नं ६, शिंदे नगर, मखमलाबाद रोड), नितीन रमेश खलमे (वय ३२, रा. वैशाली नगर, पंचवटी), साहिल फिरोज शेख, वय-२१ रा. वैशाली नगर, पंचवटी), भारत मुंकुद कंकाळ (वय २५ वर्षे रा. राजेय सोसायटी, फ्लॅटनं-१९, मेहर धाम), योगेश भिमराव जाधव (वय २९, रा. गल्ली क्र. ३, राहूलवाडी, पेठरोड).

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र आर. पाटील, पोनि (गुन्हे) सुनिल पवार, गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सतिष शिरसाठ व पथक, भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व पथक तसेच गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथक यांनी ही कामगिरी बजावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!