Homeक्राईमपंचवटी व म्हसरूळ हद्दीत १० घरफोड्या करणारा सराईत शिताफीने जेरबंद; १३ लाखांचा...

पंचवटी व म्हसरूळ हद्दीत १० घरफोड्या करणारा सराईत शिताफीने जेरबंद; १३ लाखांचा ऐवज हस्तगत

– पंचवटी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
गणेशोत्सव बंदोबस्ताचा ताण असतानाही पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शहरातील पंचवटी व म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून शिताफीने जेरबंद केला आहे. फारूक रज्जाक काकर (वय- ४८, रा. लोहारी बुद्रुक ता. पाचोरा जि. जळगांव) असे त्या सराईताचे नाव असून त्याच्याकडून ११ तोळे सोने व एक किलो ५२ ग्रॅम चांदी असा १३ लाख सहा हजार ७५४ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (परिमंडळ एक) मोनिका राऊत, सहायक आयुक्त (पंचवटी विभाग) संगिता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहायक निरीक्षक सतिश शिरसाठ, सहायक उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार कैलास शिंदे, अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, जयवंत लोणारे, युवराज गायकवाड, अंकुश काळे, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, योगेश वायकंडे, विनोद चितळकर, नितीन पवार, तनुजा शिंदे यांनी ही कामगिरी बजावली आहे. 

पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत

याबाबतचे अधिक वृत्त असे की, पंचवटी पोलीस स्टेशन हददीत २३ अॉगस्ट रोजी कल्पेश पार्क बि, फ्लॅट नं ०८, राधानगर ड्रिम कॅसलच्या मागे, मखमलाबाद रोड येथे घरफोडी झाली होती. या गुन्हयाच्या तपासाबाबत व वाढत चाललेल्या घरफोड्या बाबत वरिष्ठांनी मार्गदर्शक सूचना पथकाला केल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पंचवटी पोलीस स्टेशन हददीत झालेल्या सर्व घरफोड्याचे सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीचे गुन्हा करण्याची ‘मोडस् अॉपरेंडी’ व घरफोडी करण्याची वेळ यांचा सखोल व बुध्दी कौशल्याचा वापर करून सदर आरोपीला पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिलेल्या सूचना दिल्या.

त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहायक निरीक्षक सतिश शिरसाठ यांनी दोन पथके तयार करून पंचवटी हददीत ज्या परिसरात वारवांर घरफोड्या झाल्या आहे अशा ठिकाणी आरोपी रात्री येण्याच्या मार्गावर मखमलाबाद रोड, ड्रिम कॅसल, गणेशनगर परिसरात एक टिम व दुसरी टिम औदुबंर नगर, अमृतधाम परिसर या भागात रात्री ११ ते पहाटे ४ वाजे दरम्यान ३ ते ४ दिवस सापळा लावून बसले. या दरम्यान २६ अॉगस्टला रात्री ११.३० वाजता हवालदार कैलास शिंदे, अमोल काळे, सचिन बाहिकर, वैभव परदेशी, अंकुश काळे, नितीन पवार या पथकाने सीसीटीव्ही फुटेज मधील वर्णनाच्या संशयितास शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशी असता त्याने त्याचे नाव-फारूक रज्जाक काकर असे सांगितले. अंगझडती केली असता त्याच्याजवळ घरफोडीचे साहीत्य व केलेल्या मुद्देमाल मिळुन आला. त्यावरून त्यास अटक करण्यात आली. पोलीस कोठडी दरम्यान अटक आरोपी फारूक रज्जाक काकर यास अधिक विचारपुस केली असता त्याने पंचवटी व म्हसरूळ पोलीस स्टेशन हददीतील एकूण १० गुन्हे केल्याची कबूली दिली. तसेच मुद्देमालही काढून दिला. त्याच्यावर यापूर्वी अंबड पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. पुढील तपास हवालदार अमोल काळे हे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!