Homeराष्ट्रीयगुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये विश्वशांती महोत्सव

गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये विश्वशांती महोत्सव

– परदेशातील सेवेकऱ्यांमध्ये उत्साह…

नाशिक (प्रतिनिधी): अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड या तीन देशांमध्ये सेवामार्गातर्फे विश्वशांती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामुळे परदेशातील सेवेकऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे जगभरातील एकवीस देशांमध्ये अविरत कार्य चालते. सेवामार्गाचा देश- विदेश अभियान हा विभाग सेवामार्गाचा देशभर आणि परदेशात प्रचार प्रसार करण्यात महत्त्वाचे योगदान देतो.
बालसंस्कार व युवा प्रबोधन प्रमाणेच देश-विदेश अभियान हा विभागही गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय आहे.

परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नितीन भाऊ यांनी एकवीस देशांमध्ये दिंडोरी प्रणित सेवामार्गाची ध्वजा फडकावली आहे. यापूर्वी नेपाळ आणि दुबईमध्ये सेवामार्गाचे भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय सत्संग मेळावे आणि विश्वशांती महोत्सव मोठ्या प्रतिसादात पार पडले. आता पुन्हा अमेरिकेसह तीन देशांमध्ये श्री. मोरे यांचा दौरा जाहीर झाल्यामुळे परदेशातील सेवेकऱ्यांना त्यांच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली आहे. श्री.मोरे यांनी यापूर्वी तीन वेळा सेवामार्गाच्या प्रचार प्रसारासाठी अमेरिकेचा दौरा केला होता शिवाय दुबई, नेपाळ, कॅनडा, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, इंग्लंड या देशांमध्येही श्री मोरे यांनी प्रचार दौरे केले. त्यांच्या दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यामुळे अमेरिकेत सेवामार्गाची अठरा सेवाकेंद्रे सुरू झाली आहेत. परदेशस्थ महाराष्ट्रीय तसेच उत्तर आणि दक्षिण भारतीय नागरिकांचा त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद लाभतो.

नोव्हेंबरमध्ये अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये दौरा

दि. ७ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील सिएटलमध्ये, दि ८ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजलिसमध्ये, दि.९ नोव्हेंबर रोजी बे एरिया सिटीत, दि.१४ नोव्हेंबर रोजी ॲरिझोना राज्यातील फिनिक्स शहरात, दि.१५ नोव्हेंबर रोजी जॉर्जियामधील अटलांटा शहरात तर दि.१६ नोव्हेंबर रोजी कॅनडा देशातील टोरंटो ब्रामटन शहरात आणि दि.१८ नोव्हेंबर रोजी इंग्लंडमधील न्यू कॅसल शहरात गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत विश्वशांती महोत्सव होत आहे. तरी परदेशातील सेवेकर्‍यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!