Homeधार्मिकनाशिक मधील प्रथम मानाचे स्थान; पुरातन घाटावरील तुळजाभवानी मंदिर नवरात्र उत्सवासाठी सजले...

नाशिक मधील प्रथम मानाचे स्थान; पुरातन घाटावरील तुळजाभवानी मंदिर नवरात्र उत्सवासाठी सजले !

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नवसाला पावणारी घाटावरील तुळजापूरची श्री तुळजाभवानी देवी, नाशिक जिल्ह्यातील प्रथम मानाचे स्थान असलेले नाशिक शहरात रविवार पेठेतील डांगर उतारा येथील गोदावरी किनारी पुरातन घाटावर वसलेले श्री तुळजाभवानी माता मंदिर होय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, छत्रपती शिवाजी महाराजांची वरदायनी श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे पूर्वी प्राचीन काळी ऋषीमुनींनी तपश्चर्या जप-तप अनुष्ठान करण्यासाठी डोंगर दरी नदीकिनारी शांततामय वातावरणात शोधून तेथे साधना करण्यासाठी देवदेवी देवता स्थापन केली. त्यातीलच हे प्राचीन गोदावरी नदी किनारी शिरेबंदी दगडी घाटावर मंदिर आहे.

या ठिकाणी तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही बाजूने हनुमान मंदिर आहे. पाठीमागे भुलेश्वर महादेव मंदिर तसेच वेताळ महाराज मंदिर, समोर महादेव मंदिर, झोटिंग बाबा, साती आसरा देवी तसेच अवधूत स्वामी असे अनेक देवदेवतांची मंदिरे स्थाने असून याठिकाणी सभोवताली परिसर शांततामय वातावरणात पिंपळाच्या वृक्षाखाली विश्रांतीसाठी आलेली तुळजापूरची तुळजाभवानी माता मंदिर वसलेले आहे. महाराष्ट्रात प्राचीन संस्कृतीनुसार देवी मातेचे साडेतीन शक्तीपीठे आहेत. पहिले पीठ तुळजापूरचे तुळजाभवानीचे. दुसरे पीठ कोल्हापूरचे अंबाबाईचे. तिसरे शक्तीपीठ माहूरगडचे रेणुका मातेचे. तर अर्धे शक्तिपीठ वणी गडावरील सप्तशृंगी मातेचे. नांदुरी गडावर वसलेली सप्तशृंगी माता अध्यापित म्हणून तुळजापूरचे तुळजाभवानी मातेचे मानले गेले आहे.

प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दक्षिणवाहिनी गोदावरी नदी किनारी हे तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. या मंदिरामधील आई साहेबांची मूर्ती पूर्व विमुख असून पाषाण दगडी चिऱ्यामध्ये सर्व अलंकार सहीत कोरलेली आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला राम भक्त हनुमान उजव्या बाजूला बाल हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने गोदावरी नदी वाहत आहे पूर्वी या मंदिरामध्ये जाण्यासाठी जाण्या अगोदर गोदावरी नदी पात्रात स्नान करून किंवा हात पाय धुवून भाविक जात असत. सध्या या ठिकाणी घाटावर पूर प्रतिबंधक मोठी भिंत बांधण्यात आली आहे हे मंदिरे सर्व धर्मीय भाविकांसाठी खुले आहे.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये येणारे भाविक दुःख आणि अडचणी निवारण करण्यासाठी देवीला साकडे, नवस केले जातात. भक्तांचे दुःख निवारण होऊन सुखाचा मार्ग या मंदिरात मिळत आहे. अशी ही नवसाला पावणारी ओळख असलेली घाटावरची तुळजाभवानी म्हणून संपूर्ण नाशिक जिल्ह्याला परिचित आहे. अशोक स्तंभावरून रामवाडी पूल कडे जाताना सिद्धेश्वर मंदिराच्या पूर्वेकडील गोदावरी नदी किनारी रस्त्यावरच पुरातन दगडी घाटावर हे तुळजाभवानी आईचे मंदिर आहे.

आश्विन शुद्ध प्रतिपदेस मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात येते व नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. रोज सकाळी सात वाजेला मूर्तीस स्नान अभिषेक करून अलंकार वस्त्र अलंकाराने सुशोभीत केली जाते. सकाळी आठ तीस ते नऊ वाजेस आरती होते. सायंकाळी आठ ते सव्वा आठ वाजेला रोज आरती होते. या मंदिरामध्ये नऊ दिवस धार्मिक भजन, पारायण, देवीचे गाणे असे कार्यक्रम होत असतात विशेष या मंदिरा परिसरात गरबा टिपरी नृत्य वगैरे कार्यक्रम होत नाही. खंडे नवमी या दिवशी नवरात्र उत्सवातील होम हवन पूजा केली जाते व कुमारीका पूजन केले जाते. नंतर केसरी प्रसाद वाटप केला जातो. नवमीला रात्री देवीच्या गाण्याचा कार्यक्रम होतो.

विजया दशमी या दिवशी दुपारचे नैवेद्य पाणी झाल्यानंतर दुपारी ४.३० वाजेला मातेच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालून देवी मातेचा मंदिरामध्ये स्थापन केलेला घट कलश हलविला जातो.
देवी मातेला पंचामृत स्नान अभिषेक केला जातो व वस्त्रालंकाराने मूर्ती सजविली जाते सुशोभित केली जाते. सायंकाळी सभा मंडपात देवीच्या दर्शनासाठी आलेले भक्तगण मातेस आपट्याची शमीचे पाने वाहून व भक्त एकमेकास आपट्याची पाने देत सोने लूट केली जाते.

रात्री नऊ वाजेला मंदिरामधील घटस्थापनेचे नारळ घेऊन नवरात्र देवीच्या नावाने तळी भरले जाते व मंदिरांमधील बांधलेला फुलोरा कडकण्या सोडून त्याचा सर्वांना प्रसाद वाटप केला जातो.
विजय दशमी दसऱ्याच्या दिवशी रात्री बारा वाजेला आरती करून तुळजापुरात देवीच्या मूर्तीस पलंगावर विश्रांतीसाठी पाच दिवस निद्रेस झोपविले जाते. म्हणून मंदिरामध्ये आईसाहेब विश्रांतीसाठी पाच दिवस पडदा लावला जातो.

कोजागिरी पौर्णिमेस पहाटे घंटा नाद करून आईसाहेबांना उठविले जाते मूर्ती समोरी लावलेला पडदा आठवीला जातो व मूर्ती महा अभिषेक करून वस्त्र अलंकाराने मूर्ती सुशोभित केली जाते,
त्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध प्रसाद वाटप करून या घाटावरील तुळजाभवानी नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते.

या मंदिराचे व्यवस्थापन हिरामण नाना वाघ व निवृत्ती अप्पा वाघ, सर्जेराव हिरामण वाघ यांचे परिवारातर्फे केली जाते. वैदिक होम हवन पूजन हे पुरोहित प्रदीप कुलकर्णी गुरुजी हे नित्य जोपासत आहेत. या तुळजाभवानी मंदिर भक्त मंडळाचे वतीने मकर संक्रांत, महाशिवरात्र, होळी, धुलीवंदन हनुमान जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा, निवृत्तिनाथ पालखी दिंडी भोजन, गोकुळाष्टमी, गणेश उत्सव, नवरात्र, दसरा-दिवाळी, त्रिपुरी पौर्णिमा असे वार्षिक सण मंदिरात साजरे केले जातात. तिथीप्रमाणे कार्यक्रम जोपासले जातात वर्षानुवर्ष रोज रात्री मंदिरामध्ये नित्यनियमाने आठ वाजेला आरती होत असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!