नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिक फोटोग्राफर असोसिएशन व दीपक बिल्डर्स आयोजित नाशिक शहरात प्रथमच जिल्हा पातळीवर व्यावसायिक व प्रेस फोटोग्राफर साठी भव्य फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या आर्ट गॅलरीत संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय उदगीरकर उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले या स्पर्धेतील छायाचित्रांचे परीक्षण करण्यासाठी खास नांदेडहून प्रसिद्ध छायाचित्रकार व मेंटॉर रामकृष्ण सुर्वे हे आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी एकूण १७ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले यामध्ये ‘विवाह’ या विषयात विनायक जगताप यांना पाच हजार रुपये रोख व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मयूर तुपे यांना द्वितीय पारितोषिक रुपये तीन हजार व ट्रॉफी देण्यात आली. त्याचप्रमाणे निलेश घोलप तृतीय रुपये दोन हजार व ट्रॉफी देण्यात आली. उत्तेजनार्थ दोन पारितोषिक अनुक्रमे पराग वैशंपायन व नारायण काश्मिरे रुपये रोख एक हजार व ट्रॉफी देण्यात आली.
दुसरा विषय होता ‘उत्सव महाराष्ट्रातील’, यात अनुक्रमे तुषार जाधव प्रथम रुपये रोख पाच हजार व ट्रॉफी. अभिषेक सोनवणे द्वितीय रोख रुपये तीन हजार व ट्रॉफी. चंद्रकांत सोनगिरे तृतीय दोन हजार व ट्रॉफी. उत्तेजनार्थ श्रीश वाडेकर व स्वप्निल केदारे यांना प्रत्येक रोख रुपये एक हजार व ट्रॉफी प्रदान करण्यात आले.
वृत्तपत्र छायाचित्रकारांसाठी ‘गोदामाई सौंदर्य व प्रदूषण’ हा विषय दिला होता. त्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रशांत खरोटे (लोकमत) व सतीश काळे महाराष्ट्र टाईम यांना रोख रुपये पाच हजार विभागून देण्यात आले. त्याचप्रमाणे अशोक गवळी (दिव्य मराठी) यांना द्वितीय पारितोषिक रुपये तीन हजार व ट्रॉफी प्राप्त झाले. तृतीय पारितोषिक सुद्धा विभागून देण्यात आले अंबादास शिंदे (सकाळ) व सौरभ अमृतकर (लोकमत) रुपये 1000 प्रत्येकी व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी शहरातील फोटोग्राफिक क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार फोटो गुड्स डीलर्स फोटो लॅब ओनर्स व सर्व प्रायोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरच मुंबई आणि दिल्लीच्या धर्तीवर जिल्हा पातळीवर भव्य असे फोटो फेअर आयोजित करण्याचा मानस असोसिएशनचे अध्यक्ष संजय जगताप व सेक्रेटरी नंदू विसपुते यांनी बोलून दाखविला. हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे सर्व कमिटी मेंबर्स अध्यक्ष संजय जगताप, सेक्रेटरी नंदू विसपुते, खजिनदार किरण मुर्तडक, सल्लागार प्रताप पाटील, प्रशांत तांबट, कमिटी सदस्य रवींद्र गवारे, सुनिल जगताप, तुकाराम गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे श्री जगताप व नातू कॅटर्स यांचे या कार्यक्रमासाठी खूप मोलाचे सहकार्य लाभले.

(सिने अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते उत्तेजनार्थ पारितोषिक स्वीकारताना दैनिक लोकनामा चे छायाचित्रकार श्री शैलेंद्र पांडुरंग साळी व सौ लता शैलेंद्र साळी समवेत संजय जगताप, राम कृष्ण महादेव सुर्वे, किरण मूर्तडक, सुनील जगताप प्रताप पाटील रवींद्र गवारे नंदू विसपुते, आदी मान्यवर)

























