Homeक्राईमसेवानिवृत्त न्यायाधीशासह प्राध्यापिकेचे घर फोडले; दोघांना अटक

सेवानिवृत्त न्यायाधीशासह प्राध्यापिकेचे घर फोडले; दोघांना अटक

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिकरोडमधील सेवानिवृत्त न्यायाधीश तसेच तिडके कॉलनीतील सेवानिवृत्त प्राध्यापिका यांच्या निवासस्थानी घरफोडी करून हात साफ करणाऱ्या दोघा चोरट्यांना जेरबंद करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले आहे. यातील चोरट्यांकडून सोन्या-चांदीसह तीन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉय उर्फ भुऱ्या विजय नानाजी (वय-२६) व चेतन कैलास सोनवणे अशी दोघा चोरट्यांची नावे असून ते
शरणपूर झोपडप‌ट्टी (कॅनडा कॉर्नर) येथील आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, रविंद्रनाथ खंडेराव गांगुर्डे (वय-७२, रा.मंगलमुर्ती अर्पा. चेहडीपंपिंग, नाशिकरोड) हे सेवानिवृत्त न्यायाधीश पाच ते १० जून दरम्यान कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तेव्हा त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम लंपास केली होती. यातील चोरट्यांबाबत कोणतीही ठोस माहिती नसतानाही पोलिसांनी तपासावर लक्ष केंद्रित केले होते. याचवेळी हवालदार विशाल पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सेवानिवृत्त न्यायधिशांच्या घरात चोरी करणारे दोघेजण रविवारी (दि.२७) सिन्नरफाटा परिसरात येणार आहेत. याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना जेरबंद केले.

दोघांना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या निवासस्थानी तसेच तिडके कॉलनीतील सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीमती ज्योती अशोक कुलकर्णी (वय ६७, रा. गायकवाड नगर) यांच्या निवासस्थानी केलेल्या घरफोडीची माहिती दिली. पोलिसांनी दोघांकडून २० हजार रुपये रोख, एक लाख रुपये किंमतीची व एक किलो १५ ग्रॅम वजनाची चांदीची वीट, दीड लाख रुपये किंमतीची व दीड तोळे वजनाची सोन्याची लगड, मोबाईल असा तीन लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ, बडेसाब नाईकवाडे, सहायक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, उपनिरीक्षक संदिप पवार गुन्हे शोध पथकाचे हवालदार विशाल पाटील, विष्णु गोसावी, अविनाश देवरे, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, अरूण गाडेकर, योगेश रानडे, संतोष पिंगळ, श्रीमती सोनवणे यांनी ही कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!