Homeक्राईम'कुलकर्णीज् पावभाजी'चे संचालक हेमंत कुलकर्णी यांच्यावर सशस्त्र हल्ला; लुटीचा प्रयत्न फसला

‘कुलकर्णीज् पावभाजी’चे संचालक हेमंत कुलकर्णी यांच्यावर सशस्त्र हल्ला; लुटीचा प्रयत्न फसला

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील प्रख्यात ‘कुलकर्णीज् पावभाजी’चे संचालक हेमंत कुलकर्णी यांच्यावर भाभानगर परिसरात रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दोघा युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. कुलकर्णी यांच्या व्यवसायाचे पैसे असलेली बॅग होती. ही खेचण्यासाठी चोरट्यांनी हरप्रकारे प्रयत्न केले. त्यामुळे पाळत ठेवून जबरी चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचा संशय आहे.

महात्मा गांधी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेसमोर ‘कुलकर्णीज् पावभाजी’ हे लोकप्रिय ठिकाण आहे. गुरुवारी रात्री दैनंदिन कामे आटोपल्यानंतर गल्ल्यातील रोकड घेऊन हेमंत कुलकर्णी हे दुचाकीने भाभानगर मधील घराकडे निघाले. मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोरून भाभानगर मध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार वसंतराव गिते यांच्या निवासस्थाना जवळील रस्त्यावर गतीरोधक असल्याने दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांनी आपले वाहन कुलकर्णी यांच्या वाहनासमोर आडवे लागले. त्यामुळे त्यांचा तोल गेला.

गाडी व स्वतःला सावरत असतानाच दोघा युवकांनी आपल्याजवळील धारदार लांब पात्याचे चाकू परजत कुलकर्णी यांच्या गळ्यातील पैशांची चामडी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांचा हेतू लक्षात येताच कुलकर्णी यांनी प्रतिकार व मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ते पहाताच एकाने चाकूने त्यांच्या हातावर वार करत बॅग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅगेवरील पकड अधिक घट्ट करत माजी आमदार गिते यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. हा प्रकार पाहून स्थानिक रहिवाशाने पाण्याने भरलेली जार चोरट्यांच्या दिशेने भिरकावला. त्यामुळे प्रतिकार होतेय हे पाहून चोरटे कुलकर्णी यांचा ५० हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन दुचाकीने पसार झाले.

या हल्ल्यात कुलकर्णी यांच्या हाताला जखम झाली असून शस्त्रक्रियेनंतर आठ टाके घालण्यात आले आहे. भाभानगर सारख्या वर्दळीच्या मार्गावर तसेच पोलीस ठाणे जवळच असताना घडलेल्या या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!