नाशिक – विशेष प्रतिनिधी
मालेगांव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी, जायखेडा, मालेगांव तालुका, सटाणा, नांदगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोवंश जनावरे चोरी करणाऱ्या टोळीची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. धुळे व मालेगावमधील या टोळीतील पाचजणांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. गोवंश जनावरे चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी हे बकरी ईद या सणाच्या दृष्टीने गोवंश जनावरे चोरी करण्यासाठी त्यांची रेकी करुन ठराविक ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांचेकडील इर्टिगा कार मध्ये व इतर वाहनांमध्ये गोवंश जनावरे चोरी करत असे, तसेच चोरी केल्यानंतर घटनास्थळावर कोणताही पुरावा ठेवत नव्हते.
गोवंश जनावरे चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक अधीक्षक तेगबीरसिंग संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी, नितीन गणापुरे यांच्या केलेले मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, हवालदार गिरीश निकुंभ, शरद मोगल, नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, राम निसाळ यांचे पथकाने ही कारवाई करुन गोवंश जनावरे चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणलेले आहे.
शाकीर शाह इंब्राहिम शाह फकीर (वय ३५, रा. घर. नं. ८४१ वडजाई रोडा, भुईवाडा, जि. धुळे). रहेमान शहा हारुन शहा (वय ३८ वर्षे, रा. मालदे शिवार, अश्पाक मस्जिद जवळ, ता. मालेगाव). मोहम्मद शहा हुसैन शहा (वय ३०, सध्या रा. वडजाई रोड, धुळे). संतोष किरणसिंग परदेशी (२०, रा. वडजाई रोड भोईवाडा, ता.जि.धुळे). बशिर शेख अजगर ऊर्फ फहिम हांडया (वय २३ रा. ११ हजार खोली, पवारवाडी, मालेगाव) यांना अटक करण्यात आली असून शेख सुलतान अब्दुल रज्जाक (म्हाळदे शिवार, पवारवाडी, मालेगाव) व रहेमान अस्लम कुरेशी (रा. भिक्कु चौक, मालेगांव) हे फरार आहेत.
या आरोपींनी गोवंश जनावरे चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन मारुती सुझुकी इर्टिगा कार (क्र. MH-०२-DS-७६०९) ही वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेली आहे. तसेच आरोपीतांकडुन जनावर चोरी करून कत्तलीसाठी विक्री केलेल्या पैशांपैकी २५ हजार रुपये हस्तगत करण्यात आलेले आहेत. यातील आरोपी शाकीर शाह इंब्राहिम शाह फकीर हा सराईत गुन्हेगार असुन तो मालेगांव येथील शेख सुलतान अब्दुल रज्जाक व रहेमान अस्लम कुरेशी यांच्या सोबत चोरी करण्यासाठी लागणारे गोवंश जनावरे यांच्या ठिकाणांची रेकी करुन इर्टिगा कारचा वापर करुन बंद गोठ्यातुन कटरने जाळी तोडुन व मोकळ्या ठिकाणी बांधलेले जनावरे सोडुन कत्तलीसाठी चोरी करत असल्याचे उघडकीस आलेले आहे. तसेच आरोपी व फरार आरोपी यांचे विरुध्द मालेगांव व धुळे येथील पोलीस ठाण्यात यापुर्वी जनावरे चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असुन त्यांचेकडुन गोवंश जनावरे चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपीतांना वडनेर खाकुडर्डी पोलीस ठाणेकडील वरिल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.

























