Homeक्राईमकिरण निकम हत्येतील आठ वर्षांपासून फरार 'खलनायक' हिमाचलमध्ये जेरबंद; गुंडा विरोधी पथकाची...

किरण निकम हत्येतील आठ वर्षांपासून फरार ‘खलनायक’ हिमाचलमध्ये जेरबंद; गुंडा विरोधी पथकाची कामगिरी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
पंचवटीतील पेठरोडवरील नवनाथनगर येथे १८ मे २०१७ रोजी झालेल्या किरण राहुल निकम याच्या हत्येतील प्रमुख संशयित व घटना घडल्यापासून फरार असलेला विकास उर्फ विक्की पंजाबी यास हिमाचलमधील कुलु येथे सापळा रचून जेरबंद करण्यात आले आहे. विक्की हा कुलुमध्ये ‘खलनायक’ म्हणून ओळखला जायचा. या गुन्ह्यातील चौघांना यापूर्वीच जन्मठेप लागली असून आता खलनायकाविरुद्ध स्वतंत्रपणे खटला चालवला जाण्याची शक्यता आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे यांनी ही धाडसी कामगिरी बजावली आहे.

पंचवटीतील उघडे व निकम गँग यांच्यात वर्चस्ववादातून वैमनस्य होते. १८ मे २०१७ रोजी नवनाथनगर मध्ये मोटारसायकल वरून जाणारा किरण राहुल निकम यास अडवून धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारले होते. याप्रकरणी गणेश उघडे, जितेश उर्फ बंडु मुर्तडक, संतोष पगारे, सागर जाधव, संतोष उघडे, जयेश उर्फ जया दिवे, शाम पवार, विकास उर्फ विक्की पंजाबी, अनुपमकुमार उर्फ छोटु कनोजिया यांच्याविरुद्ध खून, कट रचणे यासह विविध कलमान्वये पंचवटी पोलिसांनी गुन्हा नोंद केली होती. यातील गणेश अशोक उघडे, संतोष अशोक उघडे, संतोष विजय पगारे, जितेश उर्फ बंडु संपत मुर्तडक यांना न्यायालयाने दि. ९ मे २०२३ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर विकास उर्फ विक्की पंजाबी हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार होता.

गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागली परंतू गुन्हयातील मुख्य संशयित हा अद्यापही फरार असल्याने त्यास तात्काळ अटक करणेबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेश दिले होते. त्यानुसार विक्की याच्या २०१७ पूर्वी असलेल्या मित्रांची माहिती काढली असता तो पंजाबमधील चंदीगड येथील असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस पथक चंदीगडला रवाना झाले. तिथे विक्की पंजाबी याची गोपनीयपणे माहिती काढली असता त्यास खलनायक म्हणून ओळखत असून तो बऱ्याच वर्षांपासुन हिमाचल प्रदेश येथील कुलुमध्ये असलेल्या पुलगा गावाच्या परिसरात हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला असल्याचे गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार गुंडा विरोधी पथक हे कुल्लू येथील मनीकर्ण पोलीस स्टेशन हद्यीतील पुलगा (ता. जरी) या पहाडी वस्तीमध्ये दिनांक २३ अॉगस्टला पोहोचले. तिथे रात्री हॉटेल व घरे तपासले असता पहाटे ४ वाजता विकास विजय नायक उर्फ विक्की पंजाबी (वय-२९, रा. ७१३/२३, सेक्टर २६, बापुधाम कॉलनी, चंदीगड, पंजाब) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने अटक करून प्रथमवर्ग न्यायालय कुलु, हिमाचल प्रदेश येथे ट्रान्झीस्ट रिमांड कामी हजर केले असता त्यास चार दिवस ट्रान्झीस्ट रिमांड घेवून त्यास नाशिक येथे आणण्यात आले. पुढील तपासकामी त्यास पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!