नाशिक – विशेष प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील शहीद सर्कल जवळ असलेले गंगापूर वाईन्स या मद्यविक्रीच्या दुकानाच्या शटरची पट्टी तोडून चोरटे आत घुसले. या घटनेत सुमारे चार लाख रुपयांची महागड्या ‘स्कॉच’ दारुच्या बाटल्या चोरून पळवण्यात आल्या आहेत. अलीकडेच नाशिकरोड मधील जेलरोड परिसरात असलेले योयो वाइन्स फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड पळवली होती.
संदिप भास्कर कोकाटे (वय ४९, रा. दि एम्पीरीयल अपार्टमेन्ट, फ्लॅट न. बी-९, हॉटेल पामशेल शेजारी, मखमलाबादरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शटरचे कुलूप लावण्याच्या जागी असलेली पट्टी तोडून चोरटे आत घुसले. त्यांनी जॉनी वॉकर ब्ल्यु लेबल एक बॉटल किंमत २७ हजार, रॉयल सॅल्युट एक बॉटल किंमत २४ हजार. रामपुर असावा एक बॉटल किंमत १४ हजार ५००, रामपुर २ बॉटल २५ हजार. ग्लेन फिडीच (१८) दोन बॉटल किंमत ३१ हजार ५००, डिव्हाज (१८) एक बॉटल किंमत १० हजार ४००, ग्लेन लेबिट (१८) तीन बॉटल किंमत ४६ हजार ५००, मॅकेलन दोन बॉटल किंमत २० हजार, हिबीकी बॉटल किंमत वीस हजार ७५,डाल मोअर एक बॉटल किंमत १६ हजार ५००, शिवास अल्टीज एक बॉटल किंमत २१ हजार २००, जॉनी वॉकर (१८) एक बॉटल किंमत ११ हजार २५०, लगाव लिन एक बॉटल किंमत १४ हजार २५०, शिवास (१८) तीन बॉटल किंमत २८ हजार ५००, ग्लेन लिबीट ६ बॉटल किंमत ५१ हजार रुपये, रेड लेबल एक बॉटल दोन हजार ४०० रूपये, ब्लॅक लेबल एक बॉटल किंमत ४२०० रूपये व ४५ हजार रूपये रोख असा एकूण चार लाख ३३ हजार २७५ रुपयांचा ऐवज चोरून नेला. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कहांडळ पुढील तपास करत आहे.

























