Homeक्राईमनाशिक शहरात २० गुन्हे करणारा अट्टल चेन स्नॅचर 'एलसीबी' ने केला जेरबंद;...

नाशिक शहरात २० गुन्हे करणारा अट्टल चेन स्नॅचर ‘एलसीबी’ ने केला जेरबंद; दोन साथीदारही ताब्यात

नाशिक – विशेष प्रतिनिधी
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या तरीही नाशिक शहरात आडगाव, पंचवटी, भद्रकाली, गंगापुर, मुंबईनाका, अंबड, इंदिरानगर, नाशिकरोड, म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणारा ‘मोक्का’ तील फरारी सोमनाथ रामदास खलाटे (वय ३०, रा. खलाटेवाडी, ता. आष्टी, जि.बीड) यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने

नांदगाव शहरात चैन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्हयातील ०३ सराईत गुन्हेगार जेरबंद चैन स्नॅचिंग व चोरीचे २४ गुन्हे व मोक्का कायद्यान्वये दाखल गुन्हयात फरार असलेला सराईत आरोपी सोमनाथ खलाटे अखेर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात सापडला आहे. त्याच्यासह दोघा साथीदारांना चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात जेरबंद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ रामदास खलाटे (वय ३०, रा. खलाटेवाडी, ता. आष्टी, जि.बीड), किरण अर्जुन आजबे (वय ३४, रा. भिंगार, ता. जि. अहिल्यानगर), दिगंबर हरिचंद्र निकम (वय ३०, रा. झारूळ, ता. वैजापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी तिघा आरोपींची नावे आहेत.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, नऊ अॉगस्ट रोजी करंजगाव (ता. चाळीसगाव) येथील महिला रक्षाबंधन सणानिमित्त मनमाड येथे जात असतांना, नांदगाव शहरातील मनमाड ते नांदगाव रोडवर हॉटेल राज गार्डन समोर मोटर सायकलवर भरधाव वेगाने आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी महिलेचे गळयातील ९० हजार रुपये किंमतीचे
सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावुन चोरी करून चोरून नेले होते. याबाबत नांदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक (मालेगाव) तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांचे पथकाने गुन्हयाचे घटनास्थळ व परिसरातील तांत्रिक बाबींची पडताळणी करून, यातील अज्ञात आरोपीतांनी परिधान केलेले कपडे, त्यांचे वर्णन व गुन्हयात वापरलेली मोटर सायकलचा माग काढून यातील गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्हयाचे दिशेने गेले असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरून संशयितांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले.

संशयितांना विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता, त्यांनी तिघांनी मिळून त्यांचेकडील टी.व्ही.एस. अपाचे मोटर सायकलवर नांदगाव ते मनमाड रोडवर भरधाव वेगाने येवून नांदगाव शहरालगत एका महिलेल्या गळयातील सोन्याची पोत बळजबरीने ओरबडून चोरी केली असल्याची कबूली दिली आहे. तसेच चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे अहिल्यानगर जिल्हयातील लोणी येथील एका सुवर्णकारास विकी केल्याचे सांगितले आहे. तआरोपींनी गुन्हा करतांना वापरलेली टी.व्ही.एस. अपाचे मोटर सायकल (एमएच १७ – डी.बी. १२६५) हस्तगत करण्यात आली असून सदर आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी नांदगाव पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.

यातील सराईत गुन्हेगार नामे सोमनाथ रामदास खलाटे याचेवर नाशिक शहरातील आडगाव, पंचवटी, भद्रकाली, गंगापुर, मुंबईनाका, अंबड, इंदिरानगर, नाशिकरोड, म्हसरूळ, तसेच बुलढाणा व शनिशिंगणापुर पोलीस ठाण्यांमध्ये चैनस्नॅचिंग व चोरीचे एकुण २४ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीवर नाशिक शहरात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून तो वरील सर्व गुन्हयांमध्ये सुमारे एक वर्षापासून फरार होता. तसेच त्याचे इतर साथीदार किरण आजबे व दिगंबर निकम यांचेवर देखील यापुर्वी खुन, दरोडा, चोरी, आर्म अॅक्ट यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर आरोपीतांकडून चैन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार धनंजय शिलावटे, संदिप कडाळे, आबासाहेब पिसाळ, बाबासाहेब पवार, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने वरील गुन्हयाचे तपासात सराईत आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!