Homeक्राईमतिघा घरफोड्यांकडून तब्बल एक कोटींचे सोने हस्तगत

तिघा घरफोड्यांकडून तब्बल एक कोटींचे सोने हस्तगत

नाशिक – विशेष प्रतिनिधी

मनमाड शहरातील धाडसी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणताना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड पोलिसांनी केलेल्या कारवाईला मोठे यश लाभले आहे. याप्रकरणी तिघा सराईतांना जेरबंद करण्यात आले असून तब्बल एक कोटी पाच लाख रुपये किंमतीचे व एक किलो वजनाहून अधिक सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. या टोळीकडून घरफोडीचे विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी मालेगाव येथील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, मनमाडचे उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर व मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, मनमाड येथील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायीक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला हे अॅल्युमिनियम व्यापारी व त्यांचे कुटूंबीय बाहेरगावी गेलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे खिडकीचे गज कापुन व वाकवून त्याव्दारे घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले १२०० ग्रॅम सोन्याचे दागिने व ०८ लाख रूपये रोख असा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता. याबाबत मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा मनमाड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्तपणे तपास करत होते.
आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळ परिसरातील तांत्रिक बाबीचा काटेकोर पणे अभ्यास करून पडताळणी केली असता हा गुन्हा मनमाड शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनीच केला असल्याचा तर्क लावून तपासाची चक्रे फिरविली. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहर व चांदवड परिसरातुन संजय किशोर गायकवाड, (वय ३५, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड, ता. नांदगाव), राकेश अशोक संसारे (वय ३०, रा.आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड) व राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या (वय ३०, रा. मदिना चौक, सारडा सर्कल, मारूती मंदिराचे पाठीमागे, नाशिक. मुळ रा. सुलतानपुर चौक, संजुनगर, गोरखपुर, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील एक बंद घराचे खिडकीचे गज कापुन व वाकवून त्याव्दारे आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून त्यांचे १०५५.८५० ग्रॅम (०१ किलो ५५८५० ग्रॅम.) वजनाचे सोन्याचे दागिने असा किंमत १ कोटी ५ लाख ४० हजार रूपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटर सायकल देखील जप्त करण्यात आली आहे.

ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, मनमाडचे पोलीस निरीक्षक विजय करे, सहायक निरीक्षक भरत जाधव, तसेच स्थागुशाचे सहायक निरीक्षक किशोर जोशी, उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार माधव साळे, धनंजय शिलावटे, प्रविण काकड, विशाल आव्हाड, रावसाहेब कांबळे, प्रितम लोखंडे, श्रीकांत गारूंगे, सागर काकड, शैलेश गांगुर्डे, गोरक्षनाथ संवत्सरकर, योगिता काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, केतन कापसे, दत्ता माळी, हरिष माळी, अमोल गांगुर्डे यांनी ही कामगिरी केली आहे.
——————————————————————–

राजेश शर्मावर तब्बल २७ गुन्हे

आरोपी राजेश रामशंकर शर्मा याचेवर यापुर्वी नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्हयात मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यात घरफोडी २१, दरोडा तयारी १, चोरी ४ व जबरी चोरीचा एक गुन्हा आहे. तो प्रत्येकवेळी गुन्हा करतांना वेगवेगळे गुन्हेगारांना सोबत घेवून गुन्हे करत असतो तसेच राहण्याचा ठाव ठिकाणा नेहमी बदलत असतो. अलीकडील कालावधीतच तो छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून जामीनावर मुक्त झाला होता, तेव्हापासून त्याने मनमाड येथील त्याचे वरील साथीदारांसह पुन्हा गुन्हा केला आहे.
संजय गायकवाडवर आठ गुन्हे दाखल आहेत. त्यात घरफोडी, चोरी, दुखापत करणे आदींचा समावेश आहे. तर राकेश संसारेविरुद्ध गंभीर दुखापत, चोरी, दंगा करणे असे गुन्हे दाखल आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!