Homeक्राईमखंडणी...अपहरण...जीवे मारण्याचा प्रयत्न; टिप्पर गँगचा म्होरक्या 'मोठा पठाण' जेरबंद

खंडणी…अपहरण…जीवे मारण्याचा प्रयत्न; टिप्पर गँगचा म्होरक्या ‘मोठा पठाण’ जेरबंद

नाशिक – विशेष प्रतिनिधी
कार डेकोर व्यावसायिक निखील दर्यानानी यांचे बंदुकीच्या जोरावर भररस्त्यातून अपहरण करत एक कोटींची खंडणीची मागणी करत १५ लाख रुपये उकळणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगार तसेच टिप्पर गँगचा म्होरक्या ‘मोठा पठाण’ यास जेरबंद करण्यास नाशिक शहर पोलिसांना यश आले आहे. गुंडा विरोधी पथकाने लोणावळा, कोकण किनारपट्टी, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव असा माग काढत अखेर त्यास चाळीसगाव येथे सापळा रचून कारसह ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीर नासीर पठाण उर्फ मोठा पठाण (वय-३५, रा. एन ५१, एस.एफ. १, २२/३ नंदनवन चौक, उत्तमनगर, सिडको, नाशिक) असे संशयिताचे नाव असून तो
बहुचर्चित टिप्पर गँगचा म्होरक्या आहे. अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, कार डेकोर व्यावसायिक निखील प्रदीप दर्यानानी यांची क्रेटा कार चार एप्रिल २०२५ रोजी दुपारच्या वेळी काठेगल्ली सिग्नल येथे थांबवून दोन जण वाहनात बसले. दर्यानानी यांनी पिस्तूल दाखवत तसेच मारून टाकण्याची धमकी देत एक कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. मुंबई महामार्गावरील ‘डिकॅथलॉन’ येथे घेऊन गेल्यानंतर दर्यानानी यांना बलेनो कार मध्ये बळजबरीने बसवून घोटी-कळसुबाई शिखराकडे जाणाऱ्या रोडवर सुनसान जागी नेण्यात आले.

तिथे दर्यानानी यांना बलेनो कारमधून खाली उतरवत संशयितांनी पिस्तूलाने हवेत व जमिनीवर दोन गोळ्या झाडत दर्यानानी यांच्या भावाला साथीदाराकडे १५ लाख रुपये देण्यास भाग पाडले होते. या संदर्भात दर्यानानी यांच्या तक्रारीनुसार मुंबई नाका पोलिसांनी विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवला होता. या गुन्हयात सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याने व घटनेचे गांभीर्य पाहून गुन्हयात मोक्का कायदयान्वये कलम वाढ करण्यात आली होती. यात काही संशयितांना अटक तर काही फरार झाले होते. यातील शाकीर नासीर पठाण उर्फ मोठा पठाण हा फरार होता.
गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्हयातील आरोपी शाकीर पठाण हा १५ दिवसांपूर्वी लोणावळा व तिथून कोकण किनारपट्टीवर फिरायला गेला होता.

याबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी आवश्यक त्या सूचना देत गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड यांना मोठा पठाण याच्या मागावर पाठवले.

लोणावळा व कोकण किनारपट्टी येथे शोध घेतला असता मोठा पठाण हा टोयोटा ग्लांझा गाडी वापरत असून तो छत्रपती संभाजीनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर २५ जुलैस गुंडा विरोधी पथक त्यादिशेने रवाना झाले. छत्रपती संभाजीनगर येथे मोठा पठाणचा शोध घेत असताना तो एका ठिकाणी राहत नसून चाळीसगाव, मालेगाव व छत्रपती संभाजीनगर येथे फिरस्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मालेगाव, चाळीसगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आज (दि. २७) पहाटे पिर मुसा कादरी बाबा दर्गा, पाटनादेवी रस्ता (चाळीसगाव, जिल्हा जळगाव) येथे मिळून आला. त्याच्या ताब्यातील व गुन्हयात वापरलेले चारचाकी टोयोटा ग्लांझा वाहन कमांक (एमएच ११ डीडी २१०१) सह शिताफीने ताब्यात घेवून नाशिक येथे आणून मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!