– आमदारांनी घेतली तात्काळ दखल…
पंचवटी । प्रतिनिधी
मखमलाबाद नाका ते मखमलाबाद तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ते मखमलाबाद गाव या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नाशिक महानगरपालिकेने जर सकारात्मक कार्यवाही केली नाही तर गावाच्या वतीने तीव्र जन आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्याचा ग्रामस्थांनी मखमलाबाद सोसायटी येथे बैठकीत केला. परंतु तत्पूर्वी विभागाचे आमदार अँड.राहुल ढिकले यांची भेट घेऊन त्यांनाच निवेदन देत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साकडे घालण्यात आले.
मखमलाबाद नाका ते मखमलाबाद आणि श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ते मखमलाबाद गाव या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मखमलाबाद सोसायटीत बैठक घेण्यात आली. यावेळी या रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने त्याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक व विद्यार्थ्यांच्या मदतीने तीव्र जन आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बैठकीत नारायण काकड यांनी जनआंदोलन उभे करण्यापूर्वी विभागाचे आमदार राहुल ढिकले यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे ठरले. त्यानंतर बैठकीस सर्व उपस्थितांनी आमदार अँड. राहुल ढिकले यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये प्रा.अशोक पिंगळे, शंकरराव पिंगळे, नारायणराव काकड, गोकुळ काकड , भास्करराव पिंगळे, देविदास घाडगे, नितीन पिंगळे, दामोदर मानकर, पहिलवान वाळू काकड, प्रल्हाद काकड, योगेश काकड, अरुण पिंगळे सर, चंद्रभान सिताराम पिंगळे, विक्रम कडाळे, विश्वनाथ पिंगळे, शिवाजी हेंगडे, पंडितराव तिडके, मधुकर पिंगळे, सुरेश पिंगळे, वसंतराव पिंगळे, पंढरीनाथ पिंगळे, राहुल काकड, भरत काकड आदी उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिका आयुक्त स्तरावर रस्ता भूसंपादन व आर्थिक बजेट अडचणीमुळे गोदावरी नदीवरील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ते मखमलाबाद गाव या रस्त्याचं कामकाज नामंजूर करण्यात आल होतं. परंतू आमदार ढिकले यांनी
अलीकडेच साडेतेरा कोटी रुपये बजेटचा काँक्रीट रस्ता पाटा पर्यंत प्रस्तावित व मंजूर केलेला आहे . शिष्टमंडळाच्या भेटीनंतर उर्वरित रस्ता लागलीच पुढे गावापर्यंत करण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक आयुक्त किंवा विभागीय अधिक आयुक्त तसेच मुख्यमंत्री यांच्याशी भेटून सदर रस्त्याच काँक्रिटीकरणाचे कामकाज सुरू करण्यात येईल असे केवळ आश्वासन न देता आयुक्त व शहर अभियंता यांच्याशी संपर्क साधत फोनवर चर्चा करून शिष्टमंडळासमोरच स्वतःच्या लेटरहेडवर कामकाजाचा मजकूर तयार तयार करत त्याची दखल आमदार अँड ढिकले यांनी घेतली असल्याने त्यांचे सर्व शिष्टमंडळातील सदस्यांनी आभार मानले.

























