– अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काढली संयुक्त वर्गणी…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहून नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्वयं स्फुर्तीने मदतीचा हात पुढे केला आहे. ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संयुक्त वर्गणी काढत पाच लाखांचा धनादेश ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ म्हणून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूपूर्त केला आहे.
राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पशुधनाचे अतोनात नुकसान झाले. बाधित शेतकरी बांधवांना मदत व्हावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी सामाजिक भान जपत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त वर्गणी काढत पाच लाखांचा निधी संकलित केला. या निधीचा धनादेश अधीक्षक पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूपूर्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामीण पोलीस दलाच्या सामाजिक उत्तरदायित्वाचे केले. या निधीचा विनियोग आपत्तीग्रस्तांसाठी करण्यात येणार आहे.

























