नाशिक – विशेष प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मार्गावरील बेझेफाटा येथे मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात अंबडमधील पंकज दिलीप दातीर (वय ३१) व अभिषेक ज्ञानेश्वर घुले (३०) या युवकांचा मृत्यू झाला. दोघांवर आज (दि. २३) सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री
साडे अकरा वाजेच्या सुमारास कारने नाशिककडे येत असताना दुभाजकाला धडकल्याने नियंत्रण गमावले. यात दोघांचा मृत्यू झाला. मयत पंकज हा
पंकज हा अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अधिकारी होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. तर मयत अभिषेक याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. या युवकांच्या निधनाने अंबड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

























