Homeशहर व जिल्हा१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी 'संपूर्ण सुरक्षा केंद्रा'ची जय्यत तयारी

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

– अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

पंचवटी । विशेष प्रतिनिधी
दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’च्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्थांच्या (एनजीओ) प्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या या शिबिरात आरोग्यविषयक महत्त्वाच्या कायद्यांवर आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिकेचे नगरसेवक हेमंत (अण्णा) शेट्टी उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सरिताताई सोनवणे, नीलमताई पाटील, चंद्रकलाताई धुमाळ यांच्यासह शंकर हिरे, युवराज सोनवणे, दिगंबर धुमाळ आणि मायको हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध शेवाळे, डॉ. योगिता लोखंडे व डॉ. जुई दराडे उपस्थित होत्या.

आरोग्य आणि कायद्याचे मार्गदर्शन

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या व्यवस्थापक वैष्णवी पाटील यांनी केंद्राच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी यांनी एचआयव्ही/एड्स बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर, जिल्हा पर्यवेक्षिका सुनीता हिरे यांनी ‘भेदभाव आणि एचआयव्ही/एड्स प्रतिबंध कायदा २०१७’ याविषयी कायदेशीर माहिती दिली. बिटको रुग्णालयाच्या गुप्तरोग विभागाच्या समुपदेशक तथा एसएसके काउंसलर अनिता गोरे यांनी गुप्तरोग आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर प्रबोधन केले.

मेगा शिबिराचे नियोजन

आगामी १० मार्च रोजी होणाऱ्या ‘मेगा शिबिरा’च्या पूर्वतयारीचा या बैठकीत विशेष आढावा घेण्यात आला. परिसरातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शिबिरस्थळी आणण्यासाठी आशा सेविकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना शंकर हिरे यांनी या मेगा शिबिरास सर्वांच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन इंदिरा गांधी रुग्णालयाचे आयसीटीसी समुपदेशक अरविंद शिरसागर यांनी केले. यावेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ मनीषा पाटील, मायको सातपूरच्या समुपदेशक अश्विनी भोसले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमांगिनी जोशी, विजय इंदवे, एम अँड ई ऑफिसर योगिता खंडागळे, पंचवटी टीबी युनिटचे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक तुषार जावळे, टीबी एचव्ही जोपळे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

गावठाणाचे घडवू या भविष्य…निवडून आणा धनुष्य ! प्रभाग १३ मध्ये शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच...

0
नाशिक । प्रतिनिधी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्य्यात आलेली असताना शनिवारी अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या उपमुख्यमंत्री व ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड जाहीर सभेने शहरातील...

error: Content is protected !!