Homeधार्मिकराष्ट्रहितासाठी मथुरेत भागवत सप्ताह - परमपूज्य गुरुमाऊली

राष्ट्रहितासाठी मथुरेत भागवत सप्ताह – परमपूज्य गुरुमाऊली

नाशिक – विशेष प्रतिनिधी

भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गोवर्धनवासियांचे रक्षण केले होते. आता सेवेकर्‍यांनी राष्ट्र रक्षणासाठी त्याच गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी होत असलेल्या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये शनिवारी (१४जून) विश्वशांती आणि राष्ट्र संरक्षणासाठी एक दिवसीय सामुदायिक श्रीमद् गुरुचरित्र पारायण घेण्यात आले. या पारायणात राज्यभरातून आलेल्या ९०० सेवेकर्‍यांनी सहभागी होऊन श्रींच्या चरणी सेवा समर्पित केली. सायंकाळी परमपूज्य गुरुमाऊलींचा साप्ताहिक सत्संग उत्साहात पार पडला.

२७ जूनपासून मथुरेत भागवत सप्ताह

परमपूज्य गुरुमाऊली श्री. मोरे म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाच्या लीला अगाध आहेत. त्यांच्या अलौकिक कार्यामुळे महाभारतकारांनी त्यांना २६ पदव्या बहाल केल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाची पुण्यभूमी असलेल्या मथुरा क्षेत्री समस्त सेवेकरी परिवाराला २७ जून ते ४ जुलै २०२५ या काळात भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त होत आहे. या संधीचे सोने करा, ही अमूल्य सेवा चुकवू नका असा उपदेश त्यांनी केला.

विशेष सेवेतून सप्ताहाचे प्रासादिक आशीर्वाद..

ज्या सेवेकऱ्यांना मथुरेत राहून संपूर्ण सात दिवसांचा सप्ताह करणे शक्य होणार नाही, अशा सेवेकऱ्यांना ४ जुलै रोजी सांगतेच्या दिवशी होणाऱ्या श्री महाविष्णू याग, श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन आणि श्री सत्यनारायण पूजन या विशेष सेवांमध्ये भाग घेता येईल. सांगतेच्या या विशेष सेवेत सहभागी झाल्यानेदेखील संपूर्ण भागवत सप्ताहाचे प्रासादिक आशीर्वाद भाग्यवान सेवेकऱ्यांना लाभतील असे गुरुमाऊलींनी स्पष्ट केले. श्री गुरु कार्ष्णि आश्रम, बडी परिक्रमा रोड, गोवर्धन मथुरा या ठिकाणी भागवत सप्ताह घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

२१ जून रोजी मासिक महासत्संगजून महिन्याचा मासिक महासत्संग चौथ्या शनिवारी होण्याऐवजी तिसऱ्या शनिवारी म्हणजे २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. तसेच २२ जून रोजी गोदावरी स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबीर घेण्यात होईल. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीर देखील २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. अशी आगामी उपक्रमांची माहिती जाहीर करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!