Homeशहर व जिल्हाचैतन्यमय मन व शारीरिक स्वास्थ्यासाठी योगसाधना आवश्यक - रोहिणी शिरसाठ

चैतन्यमय मन व शारीरिक स्वास्थ्यासाठी योगसाधना आवश्यक – रोहिणी शिरसाठ

नाशिक – विशेष प्रतिनिधी

मनाला चैतन्यमय ठेवण्यासाठी व शारीरिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी योगसाधना’ हा जीवन शैलीचा भाग बनवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात योग जीवनात आनंद निर्माण करतो व मानसिक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. असे प्रतिपादन योग प्रशिक्षक रोहिणी शिरसाठ यांनी केले.

विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, व निसर्गयोगी योग व निसर्गोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सामुदायिक योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला. सदर उपक्रमाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.

रोहिणी शिरसाठ म्हणाल्या की, विचारांना तसेच मेंदूला कायमच सजग ठेवण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. त्यातून मन प्रफुल्लीत राहते व सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होते. ओमकाराची साधना आणि प्राणायामातून शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते आणि त्यातून मनोबल वाढते. निरामय व निरोगी जीवनाचा योगा हा प्रभावी मंत्र आहे. योगसाधना ही शारीरिक, मानसिक स्थैर्य देणारी शक्ती आहे. प्राणायामातून श्‍वासावर नियंत्रण तर होतेच त्याचबरोबर एकाग्रता, चिंतनाची शक्ती विकसित होते. यावेळी त्यांनी विविध आसने उपस्थितांकडून करून घेतले आणि आसनांची अभ्यासपूर्ण माहिती दिली. यावेळी योग शिक्षक नीलिमा पटेल यांनीही मार्गदर्शन केले. या सामुदायिक योगाभ्यास वर्गासाठी मोठ्या प्रमाणावर साधक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!