Homeशहर व जिल्हारोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने 'नेशन बिल्डर अवॉर्ड' समारंभ संपन्न; विविध क्षेत्रात...

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ समारंभ संपन्न; विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजनांचा गौरव

नाशिक – विशेष प्रतिनिधी
राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पाच सप्टेंबर. त्यामुळेच रोटरी क्लब ऑफ नाशिक सारखी संस्था सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध कला गुण असणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करते, हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे उद्गार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२५ च्या समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. गौरव सामनेरकर होते. विक्रम बालाजीवाले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी कला, क्रीडा, संगीत व नृत्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृष्णाजी जाधव, वैशाली विष्णू खैरनार, मनीष बोरस्ते, गोरक्षनाथ काठे, सुनीता कारभारी उशीर, पुनम ज्ञानदेव भामरे, मेघा दीपक तायडे, सीमा विठोबा नाडेकर, गौरी दसककर व दिपाली प्रकाश वरुडे या शिक्षकांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे गणेशोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात शिवराज राजेश सिंग, काजल गवई, नारायणी विधाते, राशी मराठे व मुस्कान सिंग या पहिल्या पाच मुलांना बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमास मकरंद चिंधडे, शिल्पा पारख, ओम प्रकाश रावत, मुग्धा लेले, रवी महादेवकर आदी उपस्थित होते. तर अॅड .राजेश्वरी बालाजीवाले, मोना सामनेरकर, सुचित्रा माने, सोनाली चिंधडे, विश्वजीत दळवी, हरिष गोरिंग्टल व सुप्रिया मांडगुळकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!