नाशिक – विशेष प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक चा नवीन सभासदांचा रोटरी प्रवेश सोहोळा 5 ऑगस्ट रोटरी हॉल गंजमाळ येथे उत्साहात संपन्न झाला.
नवीन १८ सभासद रोटरी कुटुंबात सामील झाले. सर्व जुन्या सभासदांनी नवीन सभासदांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. असिस्टंट गव्हर्नर मुरली राघवन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री. राघवन यांनी अतिशय थोडक्या शब्दात नविन सभासदांना मार्गदर्शन केले अणि त्यांना रोटरी मधील जवाबदारी समजावून सांगितली.या नंतर माजी अध्यक्ष डॉ. श्रीया कुलकर्णी ह्यांनी रोटरी बेयोंड बॉर्डर ह्या बद्दल अतिशय सूंदर शब्दत आणि प्रेसेंटेशन देऊन माहिती दिली..
रोटरी क्लब ऑफ नाशिकचे डॉ.गौरव सामनेरकर, सचिव प्रशासन रेखा पटवर्धन, सचिव प्रकल्प आर्कि. मकरंद चिंधडे, नियोजित अध्यक्ष शिल्पा पारख, संचालक अमित पगारे ह्यानी नूतन सभासद ह्यांना ८१ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या विवध उपक्रमात आपले योगदान देण्याचे आवाहान केले.
याप्रसंगी मयूर तांबे, प्रणाली देशपांडे, संदीप कुलकर्णी, प्रथमेश मांडगे, रेणुका गोरियंतल, हरीश गोरीयेतल, मिहीर नानल, योगेश दुसाने, राजेंद्र डुंगरवाल, महेश निकम, वर्षा निकम, नयना सोनजे, हरी कुलकर्णी, महेंद्र एकबोटे, ॲड. कांतिलाल तातेड, अमित केले या सदस्यांनी रोटरीचे सभासदत्व ग्रहण केले. ह्या नूतन सदस्यांना सभासदत्वाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ॲड. राजेश्वरी बालाजीवाले, मयूर तांबे आणि प्रणाली देशपांडे ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. मोना सामनेरकर, रोहित देशपांडे, लीना बाकरे, सोनाल कोतकर, वृषाली ब्राम्हणकर ह्यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. आभार प्रदर्शन सचिव रेखा पटवर्धन ह्यानी केले.

























