Homeशहर व जिल्हा'रोटरी क्लब ऑफ नाशिक' तर्फे दुर्गम भागातील बारा मुलांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

‘रोटरी क्लब ऑफ नाशिक’ तर्फे दुर्गम भागातील बारा मुलांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

नाशिक – विशेष प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे मॅग्नम हॉस्पिटल, येथे ग्लोबल ग्रँट- कॅथ लॅब प्रकल्पांतर्गत दुर्गम भागातील पाच ते बारा वर्षे या वयोगटातील बारा मुलांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रोटरी क्लब ऑफ नाशिक सामाजिक बांधिलकीच्या भावनेने समुदाय सेवा व रोगप्रतिबंध व उपचार या सेवा मार्गांशी सुसंगत तसेच समाजातील वंचित लोकांसाठी जीवनावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणासंबंधीचे अनेक प्रकल्प सातत्याने राबवित असते.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील पाच ते बारा वर्षे वयोगटातील बारा मुलांना जन्मताच त्यांच्या हृदयामध्ये छिद्र होते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत वेळेवर योग्य ते निदान उपचार न झाल्यास अशा मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम संभावतात. तशातच या शस्त्रक्रियांचा खर्च दीड लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत येत असल्याने ग्रामीण भागातील अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना तो खर्च परवडत देखील नाही. रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या या उपक्रमामुळे या मुलांना मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार मिळालेत.

यावेळी मॅग्नम हॉस्पिटलचे ख्यातनाम हृदय रोग तज्ज्ञ डॉ.मनोज चोपडा यांनी वैयक्तिकरित्या रुग्ण मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना शस्त्रक्रियेची प्रक्रिया समजावून सांगितली. या शस्त्रक्रियांमुळे मुले आपले भावी आयुष्य यशस्वीरित्या जगू शकतील असेही त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर, सचिव सीए रेखा पटवर्धन तसेच सदस्य रवी महादेवकर, प्रकल्प सचिव मकरंद चिंधडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!