पंचवटी – प्रतिनिधी
तांत्रिक विश्लेषण व मानवी कौशल्याचा वापर करत
घरफोडी, चोरी, स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पकडून सहा गुन्ह्यांची उकल करणाऱ्या म्हसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शाबासकीची थाप दिली आहे. या पथकाचा सत्कार करत त्यांना प्रशस्ती पत्रक प्रदान करण्यात आले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक आयुक्त संगिता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या नेतृत्वाखाली सीडीआर, एसडीआरचे विश्लेषण करून व मानवी कौशल्याचा वापर करून सराईत रितेश भाऊसाहेब चव्हाण व साहिल केशव निकम यांना ताब्यात घेतले होते. या संशयितांकडून म्हसरूळ पोलीस ठाणे व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी, चोरी, स्नॅचिग असे सहा गुन्हे घडकीस आणून ६ लाख ५५ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला होता.
या कामगिरीबद्दल वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक दिपक पटारे, सहायक उपनिरीक्षक बाळासाहेब मुर्तडक, हवालदार सतिष वसावे, देवराम चव्हाण, राकेश शिंदे, प्रशांत वालझाडे, मनोज आहेर, पंकज चव्हाण, पंकज महाले, ज्ञानेश्वर कातकाडे, गुणवंत गायकवाड, स्वप्नील गांगुर्डे, भाऊराव गवळी, नितिन पारधे, योगेश सस्कर यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.

























