Homeशहर व जिल्हाविक्रमी पावसाचे सातत्य राहिल्यास गोदेला महापूर ?

विक्रमी पावसाचे सातत्य राहिल्यास गोदेला महापूर ?

नाशिक – विशेष प्रतिनिधी
प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नाशिककरांना मे व जूनमध्ये झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला होता. त्यातच जूनमध्ये पर्जन्यराजाने नाशिककरांवर कृपादृष्टी दाखवत विक्रमी नोंद केल्याने गोदावरीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. तर गंगापूर धरणही सुमारे ६५% भरले आहे. पावसाचे हे सातत्य कायम राहिल्यास, गोदेला महापूर येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

शहरासह नाशिक जिल्ह्यात यावर्षी पावसाचे रूद्ररुप बघावयास मिळाले. बेमोसमी पावसासह मोसमी पावसानेही धूमधडाक्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणांचा जलसाठा निम्म्यापेक्षा अधिक भरला आहे. शहर व परिसरात मागील दहा वर्षामध्ये जूनमध्ये कधी नव्हे इतका पाऊस यंदा पडला. या २३ दिवसांत ३१५ मिमी पाऊस पेठरोडवरील भारतीय हवामान निरीक्षण केंद्रात मोजण्यात आला. यापूर्वी २०१७ साली जूनमध्ये सर्वाधिक २४९.४ मिमी इतका पाऊस पडल्याची उच्चांकी नोंद हवामान केंद्राच्या दप्तरी होती. जूनमध्येच गोदावरी, दारणा, कडवा या नद्यांमधून विसर्ग सुरू करावा लागला. यावर्षी मे महिन्यात १८७ मिमी इतका पाऊस पडला होता.

यानंतर ५ जून रोजी शहरात जोरदार सरी बरसल्या. १६ मिमी इतकी नोंद त्यादिवशी झाली होती. त्यानंतर पाच दिवस विश्रांती घेत पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली होती. १५ जूनपासून आतापर्यंत पावसाचा जोर शहरात कमी-अधिक फरकाने टिकून राहिला आहे. यामुळे गोदावरी नदी खळाळून वाहू लागली असून यावर्षी गोदेच्या पूराचे मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीला वरूणराजाच्या कृपेने गोदामाईकडून जूनमध्येच जलाभिषेक घालण्यात आला. आतापर्यंत दोनवेळा गोदावरी नदीला पूरसदृश आहे.

पावसाचा हा धडाका कायम राहिल्यास गोदेला यंदा महापूराची शक्यता ज्येष्ठ जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गोदाकाठचे रहिवाशी व व्यापारी यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. गोदाघाटावर धार्मिक विधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

(सर्व छायाचित्रे – सचिन निरंतर)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!