नाशिक – विशेष प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्यावतीने शुक्रवारी (दि.२२) संध्याकाळी सहा वाजता अ.भा. मराठी नाट्य परिषद सभागृह, कालिदास कलामंदिर येथे स्नेहल जोशी लिखित आणि स्वप्नमंजुषा दिग्दर्शित ‘बळीचं तळं’ या कथेचे अभिवाचन आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रा.रविंद्र कदम यांनी दिली.
या मासिक अभिवाचन उपक्रमात मंजुषा ठाकरे, स्वप्ना प्रसाद, कुणाल विधाते हे अभिवाचक अभिवाचन करणार असून या अभिवाचनास संगीत दुर्वा प्रसाद हिचे असणार आहे.
सदर अभिवाचनाचे आयोजन विजय शिंगणे, श्रीया जोशी, श्रीराम वाघमारे या कार्यकारिणी सदस्यांनी केले असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
सदर अभिवाचनास नाट्यकर्मी तसेच नाट्यरसिक प्रेक्षकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे यांनी केले आहे.

























