पंचवटी : प्रतिनिधी
मनपा शाळा रायगड चौक येथील मनपा शाळेतील शिक्षक दत्तात्रय रामभाऊ बुनगे यांना कालिका देवी मंदिर संस्थांनच्या वतीने कै.गंगाराम गोपाळराव पाटील (कोठावळे) गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
श्री कालिका देवी मंदिर संस्थान यांच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यात मनपा शाळा रायगड चौक येथील शाळेतील आदर्श शिक्षक दत्तात्रय रामभाऊ बुनगे यांनाही आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते कै.गंगाराम गोपाळराव पाटील (कोठावळे) गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव आण्णा पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉ.प्रतापराव कोठावळे, आयोजन समिती अध्यक्ष अशोक दुधारे यांच्यासह मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.

























