– जग्वेंद्रसिंग राजपूत, विश्वास पाटील, कड यांचा समावेश
नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांची गंगापूर तर गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांची अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी प्रशासकीय तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आज (दि.३) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार झालेल्या बदल्या पुढीलप्रमाणे – (कंसात नियुक्तीचे ठिकाण)
पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, अंबड (प्रभारी, इंदिरानगर ठाणे). पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, भद्रकाली (प्रभारी, सातपूर ठाणे). पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सायबर ठाणे (प्रभारी, आडगाव ठाणे), पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, मुंबई नाका (प्रभारी, एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी), वरिष्ठ निरीक्षक रणजित नलवडे, सातपूर (प्रभारी, विशेष शाखा). वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे, आडगाव (प्रभारी, सायबर पोलीस ठाणे). वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील (प्रभारी, मुंबई नाका ठाणे), वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, इंदिरानगर (प्रभारी, शहर वाहतूक शाखा युनिट एक). पोलीस निरीक्षक तुषार अढावू, शहर वाहतूक युनिट एक (प्रभारी, शहर वाहतूक सातपूर युनिट). पोलीस निरीक्षक रियाज शेख, शहर वाहतूक, सातपूर युनिट (प्रभारी, शहर वाहतूक द्वारका युनिट).

























