Homeशहर व जिल्हागोदेच्या पुरात अडकली कार; पाण्याची पातळी वाढली

गोदेच्या पुरात अडकली कार; पाण्याची पातळी वाढली

नाशिक – विशेष प्रतिनिधी

शहरात व पाणलोट क्षेत्रात बुधवारी सुरु असलेल्या संततधारेमुळे गोदावरीला पूर आला असून दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. दरम्यान रोकडोबा हनुमान मंदिराजवळ एक कार पुराच्या पाण्यात अडकली असून ती पात्रात वाहून जाऊ नये यासाठी दोरखंडाने बांधून ठेवण्यात आली आहे.

शहर व परिसरात बुधवारी रात्रीपासूनच संततधार सुरु आहे. गुरूवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्यानंतर गोदावरीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. खबरदारीचा उपाय म्हणून रामकुंडालगतची तसेच रामसेतूजवळ असलेल्या पार्किंगमधून वाहने हलविण्यात आली. दुपारनंतर गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंडी हनुमानाच्या छातीपर्यंत पाणी लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे गोदाकाठचे रहिवाशी व व्यापारी सावध झाले होते.

याचदरम्यान गाडगे महाराज पूल ते रोकडोबा व्यायाम शाळादरम्यान पार्क केलेली कार पुराच्या पाण्यात अडकली. पाण्याच्या प्रवाहासोबत पात्रात वाहून जाऊ नये म्हणून परिसरातील कार्यकर्त्यांनी कार दोरखंडाने बांधून ठेवली. ही कार पर्यटकाची असून पाण्याची पातळी वाढली तेव्हा कारमध्ये कोणीही नव्हते. कार पाण्यातून काढण्यासाठी क्रेनचा वापर केला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!