– काँग्रेसतर्फे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
नाशिक – विशेष प्रतिनिधी
इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या जाचाला पिटाळून लावणारी शक्ती म्हणजे महात्मा गांधी आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता आपले आयुष्य वेचले आहे. स्वातंत्र्य लढ्याची महात्मा गांधींची प्रेरणा संपूर्ण जगाने स्वीकारलेली आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी महात्मा गांधी यांचा विचार संपू शकत नाही. महात्मा गांधी यांच्या विचाराने व संविधानाने या देशाला एकतेमध्ये बांधला आहे. असे प्रतिपादन खासदार शोभाताई बच्छाव यांनी केले.
नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी आपल्या प्रास्ताविकात येणाऱ्या काळात महात्मा गांधींचा विचार या देशाला वाचवू शकतो व प्रगतीपथाकडे नेऊ शकतो असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्राध्यापक भालचंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खासदार शोभाताई बच्छाव, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष हनीफ बशीर, मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस जावेद इब्राहिम, जिल्हा एन एस यु आय चे अध्यक्ष अल्तमश शेख, शहर आदिवासी विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, धोंडीराम बोडके, शहर काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख अण्णा मोरे ,नंदकुमार सूर्यवंशी, सॅम्युअल अवताडे, फारुख मन्सुरी, प्रकाश खळे, अब्दुल बाबा शेख ,देवराम सैंदाणे, इसाक कुरेशी, असलम पैलवान, मुस्ताक कुरेशी, प्रदेश एन एस यू आय चे सरचिटणीस समाधान बागुल, अनिल बहोत, राजकुमार जेफ, प्रशांत गांगुर्डे, अब्दुल गणी शेख, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























