Homeशहर व जिल्हानाशिक कृषी बाजार समितीतील प्रकार; ठेकेदाराकडून १ कोटी मागितल्याचा आरोप

नाशिक कृषी बाजार समितीतील प्रकार; ठेकेदाराकडून १ कोटी मागितल्याचा आरोप

पंचवटी : प्रतिनिधी
पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड परिसरातील व्यापारी संकुलातील बिल पास करून पुढील बांधकाम करण्यासाठी विनायक माळेकर यांनी तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप ठेकेदार गणेश पगार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला असून योग्य ती कार्यदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली असून ठेकेदाराने गंभीर आरोप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, गणेश बाळकृष्ण पगार हे नोंदणीकृत ठेकेदार आहेत. मागील वर्षी ९ सप्टेंबर २०२४ रोजी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथील व्यापारी संकुल क्रमांक चारचे उर्वरित बांधकाम करण्याचे काम मिळाले होते. त्या अनुषंगाने कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाल्यानंतर कामकाज सुरू केले होते. तसेच जवळपास ४० % कामकाज पूर्ण झाले असून संबंधित बिल देखील प्राप्त झाले आहे. मार्च २०२५ मध्ये बाजार समितीत सत्ता परिवर्तन झाले. एप्रिल महिन्यात बिल सादर केले असता बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर यांनी सुरू असलेले बांधकाम थांबविण्यास सांगितले. सदर काम तू कोणाला विचारून करतो. यानंतर तुला बिल कसे मिळते हे बघतो अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जातात असे अर्जात नमूद केले आहे.

त्यामुळे त्यांनी माळेकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी सदर कामाचे बिल तुला हवे असेल तर पुढच्या कामाचे एक कोटी रुपये द्यावे लागतील, त्यात पन्नास लाख रुपये अँडव्हान्स तर बिल पास झाल्यानंतर ५० लाख रूपये द्यावे लागतील, असे तक्रार अर्जात ठेकेदार गणेश पगार यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे मानसिक तणावासह आर्थिक नुकसान सामना करावा लागत आहे, तरी आपल्या स्तरावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखिल तक्रार अर्जात केली आहे.

बदनामी व्हावी म्हणून केलेला प्रकार

ठेकेदार गणेश पगार यांनी मला रात्री २ ते २:३० वाजेच्या सुमारास मला व्हॉट्स ॲप वर मेसेज टाकून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी गंगापूर पोलीस ठाण्यात ठेकदार पगार यांच्या विरोधात तक्रार केली.मी त्यांच्याकडे पैसे मागितले मधून असा काही प्रकार घडलाच नाही. तर मी तक्रार केल्याने ब्लॅक मेल करण्याच्या आणि माझी बदनामी करण्याच्या दृष्टीने करा असा अर्ज केला आहे.

विनायक माळेकर
उपसभापती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!