Homeशहर व जिल्हानियमबाह्य नंबर प्लेट अन् काळया फिल्म लावणाऱ्या वाहनचालकांकडून पावणे सहा लाखांचा दंड...

नियमबाह्य नंबर प्लेट अन् काळया फिल्म लावणाऱ्या वाहनचालकांकडून पावणे सहा लाखांचा दंड वसूल

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
वाहनाच्या नंबर प्लेटवर नियमबाह्य पद्धतीने नंबर बदलून बॉस, दादा, भाऊ, आण्णा अशा पद्धतीने बदल करून चालवणारे वाहन चालक आणि चारचाकी वाहनांना नियमबाह्य पद्धतीने डार्क काळया फिल्म लावून चावणाऱ्यांच्या विरोधात १ ते १३ जुलै दरम्यान प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने संयुक्तिक मोहीम राबवून सुमारे ८१४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांकडून सुमारे पाच लाख ७३ हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती राजश्री गुंड यांनी दिली.

मोटर वाहन कायद्यानुसार वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या नियमानुसार वाहनांवर नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. तर चारचाकी वाहनांना देखील आहे त्याच पद्धतीने काचा ठेवणे आवश्यक असताना देखील अनेक वाहन चालक वाहनांना लावण्यात आलेल्या नंबर प्लेट आणि चारचाकी वाहनांना अनाधिकृत पणे डार्क काळया रंगाची फिल्म लावून मिरवत असतात. नंबर प्लेटवर नंबरच्या माध्यमातून बॉस, दादा, भाऊ, आण्णा तसेच आडनावाच्या आकारात नंबर टाकून फिरताना दिसतात. त्यामुळे आता प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने संयुक्तिक मोहीम राबविण्यात येत असून अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जून महिन्या पासून ही मोहीम सुरु करण्यात आली असून १ ते १३ जुलै दरम्यान ही मोहीम तीव्र स्वरूपाची राबविण्यात आली. ही मोहीम पंचवटी, म्हसरुळ, आडगाव, गंगापुर, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका, अंबड, इंदिरानगर, सातपुर, उपनगर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड आदी भागात एकत्रितपणे राबविण्यात येऊन यात ४८२ काळी फिल्म लावून वाहने चालविणाऱ्यांच्या विरोधात तसेच ३३२ वाहनांना नोंदणी क्रमांक चुकीच्या पध्दतीने टाकणाऱ्या अशा एकूण ८१४ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच लाख ७३ हजार रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

महागड्या वाहनांना अद्यापही काळया काचा

प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने नियमबाह्य नंबर प्लेट आणि डार्क काळया रंगाच्या वाहनांना लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. परंतु आजही शहरात अनेक महागड्या वाहनांना डार्क काळया रंगाच्या काचा करून मिरवताना दिसतात. त्यामुळे अशी वाहने आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या नजरेस पडत नाहीत का असा प्रश्न देखील उपस्थित होतो.अनेक राजकीय पुढारी आणि काही कार्यकर्ते देखील आपल्या वाहनांवर त्या पक्षाच्या चिन्हाचा वापर करून डार्क काळया रंगाच्या काचा लावून मिरविताना दिसतात त्यामुळे अशा वाहन चालकांवर संबंधित विभाग कारवाई का असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करताना दिसत आहे.

नियमबाह्य नंबर आणि काळया फिल्म काढून टाका ! 

नियमबाह्य नंबर टाकणाऱ्यांच्या आणि काळया फिल्म लावणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने संयुक्तिक कारवाई करण्यात येत आहे.ही मोहीम यापुढेही अशीच तीव्र स्वरूपाची मोहीम राबविण्यात येणार असून ज्या वाहन चालकांनी आपल्या वाहनांवर नियमबाह्य काळी फिल्म अथवा चुकीच्या पध्दतीने नोंदणी क्रमांक लिहीला असल्यास त्वरित काढून टाकावेत किंवा दुरुस्ती करावी आपल्या वाहनांवरील कारवाई टाळावी.

श्रीमती राजश्री गुंड
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!