– राष्ट्रीय पातळीवरील महत्वाची जबाबदारी…
नवी दिल्ली :
महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे माजी युवा मोर्चा महासचिव विक्रांत चांदवडकर यांची राष्ट्रीय स्थानिक स्वराज परिषदेत राष्ट्रीय आंतरिक ऑडिटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करण्यासाठी व पंचायतीराज व्यवस्थेचे प्रशिक्षण, मार्गदर्शन व सुधारणा यासाठी या परिषदेची स्थापना गुजरातमधून करण्यात आली आहे. संस्थेला भारत सरकारच्या नीति आयोगाची मान्यता मिळालेली आहे.
देशभरातील जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडून आलेल्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय परिषदा या संस्थेद्वारे कार्यरत होणार आहेत. देशातील लाखो प्रतिनिधींना यामुळे प्रशिक्षण व दिशा मिळणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपद भरत गाजीपरा (गुजरात) यांच्याकडे असून, कार्यकारिणीत गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, अरुणाचल प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. महाराष्ट्रातून विक्रांत चांदवडकर हे राष्ट्रीय पातळीवरील महत्वाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
चांदवडकर यांनी सांगितले की, “लवकरच नवी दिल्ली, मुंबई आणि गांधीनगर येथे कार्यालये सुरू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत संस्थेचे औपचारिक उद्घाटन होईल.

























