Homeशहर व जिल्हादुतोंडी हनुमानाच्या छातीपर्यंत पूराचे पाणी वाढले; गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

दुतोंडी हनुमानाच्या छातीपर्यंत पूराचे पाणी वाढले; गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
शहर व ग्रामीण परिसरात होत असलेली संततधार, गंगापूर धरणातून होणारा विसर्ग यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पूराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंडी हनुमानाच्या छातीपर्यंत पाणी पोहचले आहे. तर रामसेतू पुलालाही पाणी टेकले आहे.

राज्यासह नाशिकमध्ये संततधार सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गंगापूर धरणातून बुधवारी (दि.२०) सकाळी आठ वाजता ५०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. एक तासानंतर हा विसर्ग १५०० क्युसेक्स करण्यात आला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली नव्हती. धरणातील विसर्ग व पावसाचे प्रमाण यामुळे गोदेच्या पाण्याची पातळी वाढतच गेली. त्यामुळे गोदाघाटावर फक्त पुराच्या पाण्याचे साम्राज्य होते. 

(छाया – अथर्व फोटो)

यामुळे बुधवारी भरणारा आठवडे बाजारही गणेशवाडी रस्त्यावर हलवण्यात आला. रामकुंड, य.म. पटांगण, रामसेतू, रोकडोबा मंदिर, म्हसोबा पटांगण आदी भागात वाढलेली पाण्याची पातळी पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गोदाघाटावरील लहान मंदिरेही पाण्याखाली गेली असून काठावरील टपऱ्या हलवण्यासाठी लगबग सुरु होती. पावसाने विश्रांती न घेतल्यास गंगापूर धरणातून अधिक प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदाघाटावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!