पंचवटी – विशेष प्रतिनिधी
देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्यावतीने संस्थेच्या दुर्गा मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय आचार्य अत्रे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धत विविध शाळांतील ११७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी देण्यात आलेल्या विषयांवर त्यांचे विचार प्रभावीपणे मांडले. काही विद्यार्थ्यांनी परीक्षकांसहित शिक्षक व पालकांनाही अंतर्मुख केले. स्पर्धेत विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांचे हस्ते झाले. आभारप्रदर्शन युवक शाखेचे कार्यवाह संदीप गोसावी यांनी तर सूत्रसंचालन निषाद दशपुत्रे यांनी केले. परीक्षक म्हणून सौ. अमृता कवीश्वर व श्रीमती गायत्री विजय शिंगणे यांनी काम पाहिले. संस्थेच्या वतीने उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विजयकुमार क्षीरसागर, विश्वस्त मोहिनीराज कुलकर्णी, व. य. कुलकर्णी, संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, कार्यवाह मकरंद सुखात्मे, सदस्य किशोर हिंगणे, सचिन निरंतर, अजय चौधरी, प्रशांत निरंतर, युवक शाखा कार्याध्यक्ष अनंत दशपुत्रे, महिला शाखा कार्याध्यक्षा सविता कुलकर्णी, सदस्या श्रीमती स्वाती पैठणकर, सुचेता देवरे, अमिता कुलकर्णी, माधवी तगारे, मंजिरी रेडगावकर, विजया म्हैसपुरकर, मंदार तगारे, चंद्रशेखर तारे, संस्थेचे व्यवस्थापक दीपक जहागीरदार, सेवक दत्तात्रय देवळालकर व सौ. दीप्ती हिंगणे उपस्थित होते.

























