Homeधार्मिकभागवत सप्ताहात श्रीकृष्ण - रुक्मिणी विवाहोत्सव अपूर्व उत्साहात संपन्न

भागवत सप्ताहात श्रीकृष्ण – रुक्मिणी विवाहोत्सव अपूर्व उत्साहात संपन्न

मथुरा – (विशेष प्रतिनिधी)
सनई चौघड्याचे मंजुळ सूर…नटून थटून सहभागी झालेली उपवर मुलं मुली…राधे राधे…गोपाल कृष्ण की जय आणि स्वामीनामाचा जयजयकार, अशा अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात भागवत सप्ताहाच्या पाचव्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांचा विवाहोत्सव हजारो सेवेकऱ्यांच्या साक्षीने अपूर्व उत्साहात तितक्याच जल्लोषात साजरा करण्यात आला.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण भूमी गोवर्धन मथुरा येथे २७ जून पासून मोठ्या उत्साहात भागवत सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. सप्ताहामध्ये दर दिवशी विविध उपक्रम आणि विशेष सेवा आयोजित केल्या जातात. सप्ताहाच्या पाचव्या दिवशी दैनंदिन सेवा, भागवताचे पठण, दुपार सत्रात रसाळ निरूपण आणि सायंकाळच्या आरतीनंतर श्रीकृष्ण – रुक्मिणी विवाह सोहळा मोठा जल्लोषात पार पडला.

यावेळी विवाह सोहळ्यात उपवर मुले मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुरुमाता सौ. मंदाकिनीताई मोरे व गुरुपुत्र नितीन मोरे यांनी वधुवराप्रमाणेच उपवर मुला-मुलींच्याही डोक्यावर अक्षता अर्पण केल्या. या मंगलप्रसंगी हजारो सेवेकर्‍यांनी एकच जल्लोष आणि आनंद साजरा केला. सेवामार्गाचे मुख्य याज्ञिकी दीपकशास्त्री मुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले. दोन्हीकडच्या बिऱ्हाडींनी आहेर म्हणून अन्नदान उपक्रमात आनंदाने सहभाग नोंदवला.

भगवान श्रीकृष्णांना ५६ भोग अर्पण…

सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी अत्यंत प्रसन्न वातावरणात कन्या विवाहकारक श्री कात्यायनी पूजन व मंत्र अनुष्ठान आणि वास्तुदोष निवारक, धनधान्य समृद्धीकारक श्री गिरीराज गोवर्धन पूजन व अन्नकूट ही विशेष सेवा आणि उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये भगवान श्रीकृष्णांना विविध प्रकारचे भोग अर्पण करण्यात आले आणि त्यानंतर सर्व सेवेकऱ्यांना प्रसाद म्हणून त्याचे वाटप करण्यात आले. सप्ताहाच्या सहाव्या दिवशी सायंकाळी श्री गुरुकृपादायक श्री दत्तात्रय महाराज यांचे पूजन आणि मंत्रानुष्ठान ही विशेष सेवा घेण्यात आली.

परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत विशेष सेवा..

परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे गुरुवार दि. 3 जुलै रोजी उपस्थित राहणार असून त्या दिवशी वंश वृद्धीकारक श्री द्वादशाक्षर मंत्र पुरश्र्चरण ही सेवा घेण्यात येणार आहे तर ४ जुलै रोजी होणाऱ्या सांगतेच्या दिवशी श्री विष्णू याग, श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन आणि श्री सत्यनारायण पूजन या सेवा होणार आहेत. या सर्व सेवा आणि उपक्रम अत्यंत नियोजनबद्धपणे भक्तांच्या अपूर्व उत्साहात सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!