– माँ साहेबांच्या प्रतिमेला केला दुग्धाभिषेक
नाशिक – विशेष प्रतिनिधी
मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कलगत असलेल्या माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज पहाटे अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकून विटंबना करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी नाशिकसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केले.

दादरमधील घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शालीमार चौकातील मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी माँसाहेब मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. आंदोलनप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख डि. जी सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख दिलीप मोरे, बाळासाहेब कोकणे, सचिन बांडे, ऋतुराज पांडे, संदेश फुले, मसूद जिलानी, महिला जिल्हाप्रमुख स्वातीताई पाटील, योगिता गायकवाड, किर्तीताई निरगुडे, संदिप कानडे, पप्पू टिळे, विशाल कदम, सुनिल गोडसे, राजू वाकसरे, शिवा चौहान, अवधूत पाटील, अनिल क्षत्रिय, अप्पा चौघुले, किरण फुले, गोरख पाटील, प्रवीण चव्हाण, सोनू कोथमिरे आदी शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.

























