नाशिक रोड – विशेष प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक २० च्या वतीने आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४०० ते ५०० नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला.
याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, राज्य संघटक विनायक पांडे, मनपातील माजी विरोधी पक्ष नेते त्र्यंबकराव गायकवाड, उपजिल्हाप्रमुख
केशव पोरजे, भैय्या मणियार, जिल्हा सचिव
मसूद जिलानी, विधानसभा समन्वयक योगेश गाडेकर, उपमहानगरप्रमुख योगेश देशमुख, विभाग प्रमुख सागर निकाळे, किरण डहाळे, चंदू महानुभव अनिल गायके, अमित भगत, विजय भालेराव विजय काळदाते, माजी नगरसेवक सुनील गोडसे राम गायकवाड, बंडू मस्के, प्राध्यापक सचिन आहेर, निलेश शिरसाठ, कैलास गायकवाड, निलेश देशमुख, मिलिंद मोरे, शुभम गायकवाड,
महिला आघाडी कोअर टीम सदस्या भारती ताजनपुरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वाती पाटील, युवा सेना विस्तारक योगिता गायकवाड, शोभा दिवे, सुवर्णा काळुंगे शोभा वाल्हे, रंजना थोरवे, माधुरी पाटील, शारदा सपकाळ, मोहनी राव, उषा गायके, मंदा गवळी, मधू पाटील माधुरी दवंगे, चित्रा सरोदे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. सृजन फीरके (हृदयरोग व मेडिसिन तज्ञ), डॉ. राधिका वट्टमवार (सर्जरी तज्ञ), डॉ. रितेश फसाले (अस्थिरोग तज्ञ), डॉ. पूजा पोकले (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. पृथ्वी जोशी (बालरोग तज्ञ),
डॉ. सृष्टी घुगे (नेत्ररोग तज्ञ), डॉ. वैभव सपकाळ, डॉ. तुषार सदगिर (सहाय्यक डॉक्टर) सुजित देशमाने (फार्मासिस्ट) आदींनी रुग्ण तपासणी केली. या शिबीरात रक्तशर्करा तपासणी, नेत्र तपासणी, हृदय, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, जनरल मेडिसिन तपासण्या करत आवश्यकतेनुसार मोफत औषध वाटप करण्यात आले. मराठा विद्या प्रसारकचे शिबिर संयोजक प्रविण वाघ व सहाय्यक दिलीप ठाकरे यांचे सहकार्य लाभले. 
शिबीर यशस्वीतेसाठी शिवसेना प्रभाग वीस मधीलशाआयोजक अश्विन पवार, योगिता गायकवाड, ज्योती गोडसे, सुनिता गायकवाड,
राजू गोडसे, सुहास पवार, भीमसेन पवार, राजेंद्र वाघ, आशिष शहाणे, केतन पवार, अक्षय कोरसिया, मिलिंद मोरे, श्रीधर गायकवाड, एस. के. सोनवणे, हेमंत भोळे संगम शहाणे आदी कार्यरत होते.

























