Homeशहर व जिल्हाविश्वास ग्रुप व 'मसाप' यांच्यावतीने चित्रपट प्रेमींसाठी 'निर्बाक'

विश्वास ग्रुप व ‘मसाप’ यांच्यावतीने चित्रपट प्रेमींसाठी ‘निर्बाक’

नाशिक – विशेष प्रतिनिधी
विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, नाशिकतर्फे चित्रपट प्रेमींसाठी ‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत *शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी यांचा बहुचर्चित ‘निर्बाक’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वावस गार्डन शेजारी), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.

आदिवासी कथांमध्ये, प्राणी बोलतात, झाडं बोलतात, सारं चराचर विश्व बोलतं. त्यातून आपलं आपल्या परिसराशी, परिवेशाशी असलेलं नातंच व्यक्त होत असतं. आता विज्ञानयुगात होमो सेपियन्स शिवाय इतर कुणालाही भाषा अवगत नाही, इतर सारे चराचर विश्व शब्दहीन आहे हे सर्व मान्य झालंय. पण शब्द नसले तरी भावना असल्या तर? प्रेम, राग, लोभ, द्वेष सगळ्या भावना आहेत फक्त त्या व्यक्त करायला शब्द नसतात एवढंच….

हे गृहीत घेऊन निर्बाक मध्ये श्रीजित आपल्याला चार प्रेमकथा सादर करतात. या चारी प्रेमी जोड्यांमध्ये एकजण शब्दहीन आहे. एक आरशातली प्रतिमा, एक झाड, एक कुत्री आणि होय, एक प्रेत. श्रीजित काय करू इच्छितायत हे आपल्याला जाणवतं. सर्वच कलाकारांची कामं चोख आहेत, पण अंजन दत्त यांचा स्वतःच्या शरीरावर, प्रतिमेवर प्रेम असलेला गोम्स आणि ऋत्विक चक्रबोर्ती यांचा शवागार सेवक मृत्युंजय कर्मकार बहार आणतात. या सिनेमाचा कालावधी एक तास ४८ मिनिटांचा आहे.

सदर कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर व विश्वास टर्फ यांचे सहकार्य लाभले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास लीलावती जयदेव ठाकूर व रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!