Homeशहर व जिल्हाभाजपा प्रवेशाच्या अफवा; मी काँग्रेसमध्येच राहणार - राहूल दिवे

भाजपा प्रवेशाच्या अफवा; मी काँग्रेसमध्येच राहणार – राहूल दिवे

नाशिक – विशेष प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमातून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार अशा अफवा येत आहेत. परंतू माझ्या इतर पक्षात प्रवेश होणार या सगळ्या अफवा असून मी आजही काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि यापुढेही काँग्रेस पक्षातच राहणार आहे, असे ठाम प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक राहूल दिवे यांनी केले आहे.

राहूल दिवे म्हणतात, मी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचा जबाबदार राज्यस्तरावर काम करणारा प्रतिनिधी आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. काँग्रेस पक्षाचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याकरता अनेक वर्षापासून काम करतो आहे. काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचारांशी मी जोडलेलो असल्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडून कुठल्याही पक्षांमध्ये प्रवेश करणार नाही. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष व संघटना मजबुती करण्याकरता मी कटिबद्ध आहे. त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाबद्दल येणाऱ्या बातम्या या अफवा असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये. माझ्या पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.

येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मजबुतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये यश प्राप्त करण्याकरता मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा नगरसेवक राहुल दिवे यांनी दिली. गेल्या काही वर्षापासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझ्या प्रभागात माझ्या विभागात ज्या पद्धतीने माझ्या कामाचा ठसा उमटवला त्यामुळे इतर पक्षांचे आकर्षण माझ्याकडे होऊ शकते. परंतू मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही. मी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी कटिबद्ध आहे असे राहुल दिवे यांनी नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!