Homeशहर व जिल्हालोकशाहीवर घाला घालणारे जन सुरक्षा विधेयक त्वरित रद्द करा; शहर काँग्रेसची मागणी

लोकशाहीवर घाला घालणारे जन सुरक्षा विधेयक त्वरित रद्द करा; शहर काँग्रेसची मागणी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांना संपविणारे तसेच लोकशाही पद्धतीने न्याय मागणाऱ्या सामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे हे जन सुरक्षा विधेयक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांप्रमाणे आता दडपशाहीने जनतेचा आवाज दाबण्यासाठी हे जन सुरक्षा विधेयक आणण्यात आलेले आहे. त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे विधेयक रद्द व्हावे म्हणून एकमुखी मागणी करीत असल्याची माहिती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.

नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जन सुरक्षा विधेयक व्हावे म्हणून आज शहर काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आले. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास सातभाई, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे आदींनी या निदर्शनाचे नेतृत्व व मार्गदर्शन केले. याप्रसंगी जन सुरक्षा विधेयक रद्द करा रद्द करा, भाजपा सरकारचा धिक्कार असो, संविधान जिंदाबाद – लोकशाही जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

जन सुरक्षा विधेयकामुळे सामान्य जनतेचे मूलभूत अधिकार काढण्याचा घाट भाजपा सरकारचा आहे. सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या व लोकशाही पद्धतीने सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज दडपशाहीने दाबण्याकरता हे विधेयक जाणीवपूर्वक भाजपा सरकार लादत आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या तरतुदींप्रमाणे देश न चालवता हुकूमशाही पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. त्यामुळे यांचा कुटील हेतू सामान्य जनतेने ओळखावा असे आवाहन याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले.

याप्रसंगी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, पंचवटी ब्लॉग अध्यक्ष उद्धव पवार, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तनवीर खान, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप शर्मा, शहर काँग्रेस आदिवासी विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्यालयीन सरचिटणीस राजकुमार जेफ, माजी नगरसेवक लक्ष्मणराव धोत्रे, जिल्हा ‘एनएसयुआय’ अध्यक्ष अल्तमस शेख, संतू पाटील जायभावे, धोंडीराम बोडके, शहर काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अण्णा मोरे, रोहन कातकडे, कुसुमताई चव्हाण ज्युलीताई डिसूजा, गुड्डी खान, इसाक कुरेशी, राहुल सूर्यवंशी, प्रकाश माळी, सोमनाथ मोहिते, सचिन हाके, असलम पैलवान, किरण खरे अशोक लहांगे, अनिल बहोत, निखिल शिंदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!