नाशिक –
भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे माजी प्रदेश अध्यक्ष विक्रांत चांदवडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. या प्रसंगी साई एव्हिएशन व ट्रायफंट एव्हिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. समाजातील विविध ५० व्यक्तींनी या प्रसंगी रक्तदान केले.
रक्तदान मोहिमेत ‘मैत्र ८९’ पेठेच्या अनेक मित्रांचा समावेश होता. तसेच स्व. सुरेखाताई भोसले खो-खो प्रबोधिनीच्या ५० विद्यार्थिनींना शालेय उपयोगी साहित्याचे तसेच खेळ उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉ. सागर चोथवे, सचिन निरंतर, ऋषी चौधरी, अनिल चौघुले, राजेश बेन्स, अर्जुन टिळे, डॉ. झाकीर शेख, डॉ. अतुल जैन, रुपेश राजवाडे, धनंजय गोखले, ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


























