नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी विद्यमान उपजिल्हाप्रमुख व श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे यांच्या सोपवण्यात आली आहे. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय राऊत यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेना अभेद्द असल्यापासून एकनिष्ठ असणारे मामासाहेब राजवाडे यांनी पंचवटीसह शहराच्या विविध भागात सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे. काम करण्याची आक्रमक पद्धत व तरुणाईचा पाठिंबा या त्यांच्या जमेच्या बाजू असून उपनेते सुनील बागुल यांच्या नेतृत्वाखाली
श्रमिक सेनेच्या माध्यमातून त्यांनी रिक्षा चालक मालक यांचे संघटन बांधून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. शिवजयंती उत्सव तसेच शिवराज्याभिषेक सोहळा आगळ्यावेगळ्या तसेच भव्य पद्धतीने साजरा करण्यातही ते अग्रेसर असतात. सध्या त्यांच्याकडे उपजिल्हाप्रमुख (पंचवटी विभाग) पदाची जबाबदारी होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देत विश्वास दर्शवला असल्याचे मानले जात आहे. राजवाडे यांच्या निवडीचे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडून स्वागत केले जात आहे.

























