– प्रभागातील समस्यांकडे दुर्लक्ष…
पंचवटी : प्रतिनिधी
नागरिकांच्या हक्कांसाठी, सुरक्षेसाठी प्रभाग खड्डेमुक्त आणि समस्यामुक्त करण्यासाठी गुरुवारी (दि.१८) सकाळी १० वाजता फडोळ मळा, हॉटेल नवदुर्गा समोर, मंडलिक वस्ती येथे जिजाई फाऊंडेशनच्या वतीने जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिजाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे यांनी दिली.

प्रभाग सहा मखमलाबाद गावाला जोडणारे मुख्य दोन रस्ते तसेच कॉलनी परिसरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ड्रीम केस्टल ते मखमलाबाद गाव, सुयोजित गार्डन ते मखमलाबाद गाव हे दोन्ही रस्ते मखमलाबाद गावाला जोडणारे मुख्य रस्ते असून या रस्त्याने वाहन चालवणे देखील मुश्किल झाले आहेत. अनेक नागरीकांचे अपघात होऊन ते जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांचे हाड देखील खिळखिळी होत आहेत.,याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. वेळोवेळी प्रशासनाला संबंधित समस्या सांगूनही त्याकडे प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहेत. सुयोजित गार्डन कडून गावाकडे येणाऱ्या रस्ताचीही दुरावस्था झाल्याने कामगार वर्ग,शेतकरी आणि विद्यार्थ्यांना त्याची झळ बसत आहे.

कॉलनी परिसरातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यासह अनेक भागात पाण्याची देखील समस्या आहे.परंतु याकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही त्यामुळे प्रभागातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त होऊन इतरही सर्व समस्या प्रशासनाने सोडवाव्यात यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज जनआंदोलन करण्यात येणार असून प्रभागातील सर्वच नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक जिजाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे व संचालिका मनिषा पालवे यांनी केले आहे.
—————————————————-
…. हीच ती वेळ !
मखमलाबाद परिसरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाचा नुकताच तारवाला ते अमृतधाम लिंक रोडवर दुचाकी खड्ड्यात आदळून मृत्यू झाला. अशाच प्रकारे मखमलाबाद रोडवर देखील खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात देखील होत आहेत. त्यामुळे प्रशासन अजून किती बळी पडणार याची वाट बघत आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्याची
हीच ती वेळ आहे !
प्रमोद पालवे
संस्थापक अध्यक्ष जिजाई फाऊंडेशन

























